Parbhani News : तुकाराम मुंडेचा मुलगा ‘ओम’ याची ‘रणजी’ संघात निवड! मानवतच्या शिरपेचात मानाचा तुरा

११ ऑक्टोबरपासून रणजी मोहीम: नरेंद्र मोदी स्टेडियमवर ओडिशाचा गुजरातविरुद्ध सलामीचा सामना
Parbhani News : तुकाराम मुंडेचा मुलगा ‘ओम’ याची ‘रणजी’ संघात निवड! मानवतच्या शिरपेचात मानाचा तुरा
Published on: 
Updated on: 

Parbhani Manwat Dr. Tukaram Munde son Om Munde odisha Ranji Team

मानवत : मानवत येथील युवा आणि उदयोन्मुख फलंदाज ओम तुकाराम मुंडे याने आपल्या दर्जेदार खेळाच्या जोरावर रणजी करंडक स्पर्धेसाठी ओडिशाच्या वरिष्ठ पुरुष संघात स्थान पटकावले आहे. ओडिशा क्रिकेट असोसिएशनने (OCA) बीसीसीआय देशांतर्गत हंगाम २०२६-२७ च्या पहिल्या दोन सामन्यांसाठी १७ सदस्यीय अधिकृत संघाची घोषणा केली असून, त्यात उजव्या हाताचा फलंदाज म्हणून ओम मुंडेचा समावेश करण्यात आला आहे. त्याच्या या निवडीमुळे मानवत शहरासह संपूर्ण परभणी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

ओडिशा क्रिकेट असोसिएशनने जाहीर केलेल्या यादीनुसार, शुभ्रांशु सेनापती याच्याकडे संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. संघात ओम मुंडेची नवोदित (Right-Hand Bat) खेळाडू म्हणून निवड झाली असून, तो रणजी करंडकात डावातील महत्त्वाची जबाबदारी सांभाळण्यासाठी सज्ज झाला आहे. ओडिशा संघाचा समावेश एलिट ग्रुप 'सी' (Elite-C) मध्ये करण्यात आला आहे.

Parbhani News : तुकाराम मुंडेचा मुलगा ‘ओम’ याची ‘रणजी’ संघात निवड! मानवतच्या शिरपेचात मानाचा तुरा
Health Officer report card : आरोग्य अधिकाऱ्यांच्या कामगिरीचे आता ‘रिपोर्टकार्ड’ : वस्तुनिष्ठ मूल्यमापनानुसार होणार पदस्थापना!

११ ऑक्टोबरपासून रणजी मोहिमेची सुरुवात

ओडिशा संघाचा पहिला सामना ११ ते १४ ऑक्टोबर २०२६ दरम्यान अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम 'बी' मैदानावर गुजरातविरुद्ध रंगणार आहे. त्यानंतर १८ ते २१ ऑक्टोबरदरम्यान तिरुवनंतपुरम येथील स्पोर्ट्स हब आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर केरळविरुद्ध दुसरा सामना होणार आहे. या दोन्ही महत्त्वाच्या सामन्यांसाठी जाहीर झालेल्या १७ सदस्यीय चमूत ओमने स्थान मिळवले आहे.

Parbhani News : तुकाराम मुंडेचा मुलगा ‘ओम’ याची ‘रणजी’ संघात निवड! मानवतच्या शिरपेचात मानाचा तुरा
Parbhani Drought | पूर्णा तालुक्यात सोयाबीनची शिवारं करपली; विहिरींनी गाठला तळ

प्रा. डॉ. तुकाराम मुंडे यांचे कनिष्ठ सुपुत्र

ओम मुंडे हा मानवत येथील के. के. एम. महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य तथा सध्या शेंदुरजना (जि. वाशिम) येथील आप्पास्वामी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुकाराम मुंडे यांचा कनिष्ठ चिरंजीव आहे. लहानपणापासूनच क्रिकेटची आवड असणाऱ्या ओमने कठोर मेहनत, सातत्यपूर्ण सराव आणि तंत्रशुद्ध फलंदाजीच्या बळावर हे यश संपादन केले आहे.

ओम मुंडेची रणजी संघात निवड झाल्याचे वृत्त समजताच मानवत शहर, क्रीडा क्षेत्र, शैक्षणिक वर्तुळ आणि विविध सामाजिक संघटनांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, आगामी रणजी हंगामासाठी त्याला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news