जिंतूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यात सध्या मराठा व धनगर आरक्षणाची मागणी लावून धरण्यात येत असून या प्रश्नी विशेष अधिवेशन बोलावण्यात यावे, अशी मागणी आमदार मेघना साकोरी बोर्डीकर यांनी मुख्यमत्र्यांकडे केली आहे. (Maratha Reservation)
मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहे. त्याची दाहकता मराठवाड्यात प्रचंड जाणवत आहे. तरुण बांधव आपले प्राण देत आहेत. यासंदर्भात गावोगावी जातीय तेढ निर्माण होत आहे. आधीच मराठवाड्यात दुष्काळ असून त्यात सामाजिक तेढ निर्माण झाले तर लोकांचं जगणं असह्य होईल. मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्याची सद्यस्थिती पाहता तात्काळ विशेष अधिवेशन बोलवावे आणि मराठ्यांची हाक ऐकावी; मराठवाड्यातील मराठा बांधवांची गरज व मागासलेपण लक्षात घेता आरक्षणाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावावा, अशी विनंती आमदार साकोरी बोर्डीकर यांनी केली आहे. मराठा आणि धनगर या दोन्ही समाज बांधवांची आरक्षणाची मागणी न्याय्य असून इतर कुठल्याही समाजाच्या वाट्याचे आरक्षण कमी न होता, कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता या दोन्ही समाजांना न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
हेही वाचा :