

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषणाला सुरूवात केलेले मनोज जरांगे – पाटील यांची प्रकृती आज (दि.३०) खूपच खालावली आहे. त्यांना धड उभाही राहता येत नाही. जरांगे स्टेजवरच कोसळले. त्यावेळी त्यांना तिथे असलेल्या दोघांनी सावरले आणि आधार दिला. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या एका मुलीने जरांगे मामा एक घोट पाणी घ्या, अशी आर्त विनवणी केली. यावेळी ती मुलगी खूपच भावूक झाली होती. (Manoj Jarange-Patil)
आज आमरण उपोषणाच्या सहाव्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून समाजबांधव आंदोलन स्थळाला भेट देत आहेत आणि मनोज जरांगे पाटील तुम्ही पाणी घ्या, पाणी घ्या, पाणी घ्या, जरांगे पाटील तुम्ही पाणी घ्या, अशी आर्त साद घालत आहेत. मी समाजाला माय बाप मानतो. मी तुमचं लेकरू आहे. आपल्या समाजाला न्याय जवळ आला आहे, असे म्हणताच कपऱ्या आवाजात बोलत असताना जरांगे पाटील यांचे डोळे पाणावले होते.
पाटील तुम्ही असे केले तर कसे होईल. पाटील तुम्ही पाणी प्या. आमचे आईका. पाणी प्या. आम्ही अनाथ झालो, तर तो न्याय काय करायचे. लढगें जितेंगे हम सब जरांगे….अशी आर्त हाक समाजातील वृध्द महिला, मुली, ज्येष्ठ नागरिक मारत असल्याने भावनिक वातावरण निर्माण झाले होते. तर जरांगे यांचे डोळे पाणावले होते.
हेही वाचा