बीड : मराठा आंदोलकांनी उपळी येथे तहसीलदारांची गाडी फोडली | पुढारी

बीड : मराठा आंदोलकांनी उपळी येथे तहसीलदारांची गाडी फोडली

वडवणी; पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षण प्रश्नी आंदोलनकर्ते आक्रमक झाले असून संतप्त आंदोलकांनी वडवणी तालुक्यातील उपळी येथे तहसीलदारांची गाडी फोडली. गाडी फोडून गाडीच्या टायरची हवा सोडण्यात आली. तहसीलदार हे मोबाईल टॉवरवर चढलेल्या तरुणांची भेट घेण्यासाठी गेले होते. यावेळी मराठा आंदोलनकांनी आक्रमक होत गाडी फोडली. यावेळी आंदोलकांनी प्रचंड घोषणाबाजी केली. (Maratha Reservation)

Back to top button