Parbhani Ambedkar Jayanti celebration : महामानवाला अभिवादनासाठी उसळला जनसागर

जय भीमच्या घोषणांनी शहर दुमदुमले : विविध उपक्रमांतून डॉ.बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार
Parbhani Ambedkar Jayanti celebration
परभणी ः येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळा परिसरात जयंतीनिमित बौध्द महासभेच्या वतीने आयोजीत अभिवादन सोहळयास उपस्थित राहिलेले हजारो आंबेडकरी अनुयायी. दुसऱ्या छायाचित्रात सर्वधर्मिय फुले, शाहू, आंबेडकर जयंती महोत्सव समितीने यावर्षी महाड मुक्ती संग्राम शताब्दीचे औचित्य साधत मानवमुक्तीचा आणि समतेचा सरंदेश देणारा केेलेला देखावा.pudhari photo
Published on
Updated on

परभणी : महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती मंगळवारी (दि.14) शहरासह संपूर्ण जिल्ह्यात अत्यंत उत्साहात, अभिमानाने आणि सामाजिक ऐक्याच्या संदेशासह मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेबांच्या पुर्णाकृती पुतळा परिसर पहाटेपासूनच निळ्या झेंड्यांनी सजला होता आणि आंबेडकरी अनुयायांच्या प्रचंड गर्दीने परिसर फुलून गेला होता.

मंगळवारी पहाटे 5 वाजल्यापासूनच अनुयायांची ये-जा सुरू झाली होती. पाहता पाहता सकाळपर्यंत संपूर्ण परिसर जय भीम घोषणांनी दुमदुमून गेला. हजारो नागरिक कोणत्याही आमंत्रणाशिवाय स्वयंस्फूर्तीने अभिवादनासाठी उपस्थित झाले होते. समाजातील वंचित, शोषित आणि दीनदलित घटकांना समानतेचा हक्क मिळवून देणाऱ्या महामानवाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा भावनिक आणि प्रेरणादायी क्षण यावेळी अनुभवायला मिळाला.

Parbhani Ambedkar Jayanti celebration
Beed Ambedkar Jayanti celebration : बीडची समता ज्योत रॅली राज्यात आदर्श

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पुतळ्यास भारतीय बौध्द महासभेच्या वतीने बुध्दवंदनेसह अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. भदन्त पी. धम्मानंद, भदन्त संघप्रिय, बौध्दाचार्य एम. एम. भरणे, डि.आय.खेडकर, अशोकराव कांबळे, वाघमारे, बाबासाहेब धबाले यांच्यासह अनेक बौध्दाचार्य व मान्यवर उपस्थित होते. पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सामूहिक बुध्दवंदना घेण्यात आली. समता सैनिक दलाच्या वतीने पुतळ्यास शिस्तबध्द सलामी देण्यात आली.

या कार्यक्रमास जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार डॉ.संदीप राजपुरे, आ. डॉ. राहुल पाटील, महापौर सय्यद इकबाल, उपमहापौर गणेश देशमुख यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील विविध भागांतून निघालेल्या मिरवणुकांनी संपूर्ण शहर अक्षरशः निळ्या रंगात न्हाले होते. ढोल-ताशे, डीजे, आकर्षक देखावे आणि घोषणाबाजीमुळे वातावरण अधिकच भारावून गेले होते.

युवक-युवती, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लक्षणीय होता. विविध सामाजिक संघटनांच्या वतीने ठिकठिकाणी अन्नदान, लाडू, खिचडी, शरबत आणि पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले. तसेच रक्तदान शिबिरे, व्याख्याने, समाजजागृतीपर कार्यक्रम आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी शहरातील विविध भागांतून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रांच्या भव्य मिरवणुका काढण्यात आल्या.

ढोलपथक, डीजे आणि विविध देखाव्यांनी मिरवणुका अधिक आकर्षक ठरल्या होत्या. ठिकठिकाणी नागरिकांनी मिरवणुकांचे उत्स्फूर्त स्वागत केले. या संपूर्ण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने शहरात कडक बंदोबस्त ठेवला होता. वाहतुकीत आवश्यक बदल करण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण कार्यक्रम शांतता, शिस्त आणि उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला. अशाप्रकारे शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती केवळ एक उत्सव न राहता सामाजिक एकतेचा, प्रेरणेचा आणि आंबेडकरी विचारांचा भव्य सोहळा ठरला आहे.

Parbhani Ambedkar Jayanti celebration
Nanded Bhim Jayanti celebration‌ : ‘जय भीम‌’च्या जयघोषात नांदेडमध्ये निळा महासागर उसळला

सर्वधर्मिय जयंती महोत्सवाच्या विचारवेधक देखाव्याचा लोकार्पण सोहळा

परभणी : गत अठरा वर्षांपासुन सर्वधर्मीय नागरीकांच्या सामुहिक समन्वयातुन विधायक उपक्रम राबवत महानायकांना अभिवादन करणाऱ्या सर्वधर्मीय फुले, शाहू, आंबेडकर जयंती महोत्सवाने यावर्षी महाड मुक्ती संग्राम शताब्दीचे औचित्य साधुन मानवमुक्तीचा आणि समतेचा संदेश देणारा देखावा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळा परिसरात सादर केला. शंभर वर्षात बदललेले जीवन या देखाव्यातुन अधोरेखित करण्यात आले. शिल्पकार राजा कांबळे यांची निर्मिती असलेल्या या देखाव्याचा लोकार्पण सोहळा महोत्सवाचे अध्यक्ष समीर दुधगावकर, अनिता सरोदे, डॉ.सुनिल जाधव, यशवंत मकरंद, प्राचार्य विठ्ठल घुले, परमेश्वर जवादे, सुनिल ढवळे, संजीव अढागळे, रवी पंडीत, संघपाल अढागळे, भुषण मोरे, संतोष कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला. अभिवादनास आलेल्या उपासकांनी देखाव्याचे कौतुक केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news