Nanded Bhim Jayanti celebration‌ : ‘जय भीम‌’च्या जयघोषात नांदेडमध्ये निळा महासागर उसळला

विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी डॉ.आंबेडकरांना अभिवादन
Nanded Bhim Jayanti celebration
‘जय भीम‌’च्या जयघोषात नांदेडमध्ये निळा महासागर उसळलाpudhari photo
Published on
Updated on

नांदेड ः भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या अनुयायांनी डीजे मुक्त जल्लोष साजरा करून एक नवा पायंडा घालून दिला. ढोलताशे, लेझीम पथके, गाणी, रॅली आणि डॉ.आंबेडकरांच्या जयघोषात निघालेल्या नियोजनबद्ध आणि शांततापुर्ण मिरवणुकांननी नांदेडकरांचे लक्ष वेधून घेतले होते. शहरातील मुख्य मार्गावर ‌‘जय भीम‌’चा गजर घुमत होता.

14 एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले होते. भीम जयंती समित्यांनी गेल्या काही दिवसांपासून या सोहळ्याची जय्यत तयारी केली होती. मध्यरात्री फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करून कार्यकर्त्यंनी 14 एप्रिल या ऐतिहासिक दिवसाचे जोरदार स्वागत केलेे. सकाळी निळे ध्वज दिमाखाने फडकावत शहरातून मोटारसायकल रॅली काढून युवा कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले.

Nanded Bhim Jayanti celebration
Bhim Jayanti Jalna : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

रेल्वेस्थानक परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे दर्शन घेवून त्यांना अभिवादन करण्यासाठी पहाटेपासूनच आंबेडकरी अनुयायांनी मोठी गर्दी केल्याचे पहावयास मिळाले. येथे समाजबांधव एकत्र येऊन समतेचा आणि बंधुतेचा संदेश देताना दिसत होते.

शहरात अनेक ठिकाणी डॉ. बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित व्याख्याने, पुस्तकांचे प्रदर्शने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचल दिसत होती. डॉ.बाबासाहेबांची जयंती हा केवळ उत्सव नसून तो समता, न्याय आणि लोकशाहीच्या मूल्यांचा उत्सव असल्याचे अनुयायांनी दाखवून दिले. जयंतीनिमित्त मिरवणुकीतील अनुयायांसाठी सामाजिक संघटनांच्यावतीने भावसार चौक, तरोडा नाका, राज कॉर्नर, वर्कशॉप, श्रीनगर, आयटीआय, शिवाजीनगर, कलामंदिर, वजिराबाद आदी ठिकाणी अन्ननदान, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि शितपेय वाटप करण्यात आले.

प्रचंड पोलिस बंदोबस्त

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहर व परिसरात प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्हा पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तसेच वाहतूक शाखेच्यावतीने जयंती मिरवणुका शांतेत पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.

Nanded Bhim Jayanti celebration
Beed Ambedkar Jayanti celebration : बीडची समता ज्योत रॅली राज्यात आदर्श

फुले-शाहू-आंबेडकर ट्रस्टच्या मिरवणुकीचे आकर्षण

सकाळी फुले-शाहू-आंबेडकर ट्रस्टच्या आगळावेगळा मिरवणुकीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. खासदार अशोकराव चव्हाण, आमदार बालाजी कल्याणकर, महापौर कविता मुळे यांच्या उपस्थितीत मिरवणुकीला प्रारंभ झाल. डीजे ऐवजी मशाल रॅलीने निघालेल्या या मिरवणुकीत हलगी पथक, मुलींचे लेझीम पथक, उंट, अश्व, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आदिवासी ढेमसा नृत्य,जीवंत देखाव्याचा रथ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य प्रतिमा, मुलींचे ढोलपथक या मिरवणुकीचे ठळक वैशिष्ट्य होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news