Jantar Mantar Delhi protest: जंतरमंतर दिल्ली आंदोलन विद्यार्थ्यावरील लाठीचार्ज हल्ला ! निषेधार्थ परभणीत कडकडीत बंद

वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंद हाकेला शंभर टक्के प्रतिसाद
Jantar Mantar Delhi protest: जंतरमंतर दिल्ली आंदोलन विद्यार्थ्यावरील लाठीचार्ज हल्ला ! निषेधार्थ परभणीत कडकडीत बंद
Published on
Updated on

पूर्णा : दिल्ली येथील संसद भवन जवळील जंतरमंतर मैदानावर सुरू असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणी (NEET Paper leack) केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा.या मागणी साठी शास्त्रज्ञ तथा सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक, कोर्क्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी मागील २२ दिवसांपासून उपोषण चालू केले आहे.

त्यादरम्यान दिल्ली पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यावर अमानुषपणे लाठीचार्ज, मारहाण, अश्रू धुर नळकांड्या फोडल्या. याच्या निषेधार्थ पूर्णा शहरात वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष यांच्या महाराष्ट्र बंद हाकेला ओ देत पूर्णा तालुका वंचित बहुजन आघाडीस सहकार्य करत व्यापारी बांधवांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला. दरम्यान २१ जुलै रोजी पासून असंख्य विद्यार्थींनी जंतरमंतरवरुन दिल्ली संसद भवनावर लाखो विद्यार्थी -विद्यार्थीनी एकत्र होऊन त्यांनी लॉंग मार्च काढला. त्यावेळी दिल्ली पोलीस व भाजपाचे हस्तक आर एस एस अशा संघटनातील छुप्या लोकांनी आंदोलनात सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांवर अमानूषपणे लाठीचार्ज करुन मारहाण केली. त्याच्या निषेधार्थ व केंद्रीय शिक्षण प्रधान मंत्री यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.

Jantar Mantar Delhi protest: जंतरमंतर दिल्ली आंदोलन विद्यार्थ्यावरील लाठीचार्ज हल्ला ! निषेधार्थ परभणीत कडकडीत बंद
CJP Jantar Mantar Protest Support : दिल्लीतील जंतर-मंतरवरील कथित लाठीमाराच्या निषेधार्थ बोरी कडकडीत बंद; व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आंदोलनात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, मारहाण करणाऱ्या पोलीसांना निलंबित करण्यात यावे, नीट पेपरफुटी प्रकरण झाल्यानंतर वैद्यकीय शिक्षणावर परिणाम झालेल्या ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या.आंदोलनात सहभागी विद्यार्थ्या, विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज करुन अमानुष मारहाण करुन घायाळ केले. आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी तात्काळ गांभीर्य घेऊन महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्यामुळे पूर्णेत बंद पाळण्यात आला. यावेळी नीट पेपर फुटी झाल्यानंतर वैद्यकीय शिक्षणावर परिणाम झाल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या अशांच्या नातेवाईकांना एक कोटी रुपये आर्थिक मदत द्यावी.

अशा स्वरुपाच्या विविध मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड,जि सं सुनील मगरे,रवि वाघमारे, श्यामसुंदर काळे,अजय काळे, तुकाराम भारती तसेच नगरसेवक प्रकाश दादा कांबळे, उत्तम दादा खंदारे,रऊफ सर, दादाराव पंडित,हाजी कुरेशी, राजकुमार सुर्यवंशी आदींचा नेतृत्वात सकाळी बुध्द विहारा पासून डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पर्यंत मोर्चा काढण्यात आला.

Jantar Mantar Delhi protest: जंतरमंतर दिल्ली आंदोलन विद्यार्थ्यावरील लाठीचार्ज हल्ला ! निषेधार्थ परभणीत कडकडीत बंद
CJP Jantar Mantar Protest Support : नीट पेपरफुटीप्रकरणी माळीनगर ते अकलूज निषेध मोर्चा; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

तद्नंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भंतेजी डॉ. उपगुप्त महाथेरो, आंबेडकर चळवळीचे नेते नगरसेवक प्रकाश कांबळे, रऊफ कुरेशी, वंचितचे युवक जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड, नगरसेवक उत्तम खंदारे, बोरगावकर,अतिक यासह आदींनी सरकारच्या आडमुठ्या धोरणा विरुद्ध खरपूस समाचार घेतला. यानंतर मागण्याचे निवेदन पोनि सचिन बेंद्रे यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना देण्यात आले. यावेळी असंख्य नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते. शहरात एकही दुकान चालू न ठेवता शंभर टक्के कडकडीत बंद पाळण्यात आला.

विद्यार्थ्यांना पाठींबा देण्यासाठी माकपच्या वतीने निदर्शने

दिल्लीमधील जंतर मंतर येथे निट पेपर फुटी विरोधात आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांना पाठींबा देण्यासाठी व अमानवीय लाठीहल्याचा धिक्कार करत माकपच्या वतीने सेलू तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी 20 जुलै रोजी दिल्ली आंदोलक विद्यार्थी युवक मोदी सरकारने अमानुषपणे लाठी हल्ला करून अनेक आंदोलकांना जखमी केले आहे. त्याचा तिव्र निषेध करत पुढील काळात आंदोलन तिव्र करण्याचा इशारा देण्यात आला. जंतर मंतर आंदोलनातील लाठीहल्याची न्यायालयीन चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा. नीट पेपर फुटी प्रकरणी दोषी असलेल्या केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची हकालपट्टी करा. नीट पेपर फुटी आंदोलनात शहीद झालेल्यांना 1 कोटी रुपये भरपाई द्या; अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी आंदोलनात कॉम्रेड रामेश्वर पौळ, सुभाष शहाणे रोहीदास हातकडके, आकाश खनपटे, ज्ञानेश्वर पौळ, विष्णू चव्हाण, विनोद धापसे, गौरव कारके सहभागी झाले होते.

Jantar Mantar Delhi protest: जंतरमंतर दिल्ली आंदोलन विद्यार्थ्यावरील लाठीचार्ज हल्ला ! निषेधार्थ परभणीत कडकडीत बंद
Parbhani News | सोनखेड येथील रद्द पाणंद रस्ता कामात बोगस मजूर नोंदी; सखोल चौकशीची सरपंचांची मागणी

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाथरी कडकडीत बंद निषेध मोर्चा

पाथरी : नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी संसदेसमोर शांतता मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला केल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंद चे आवाहन केले होते. त्यानुसार वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाथरी शहर बंद ठेवण्यात आले व तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात उबाठा शिवसेना, किसान सभा व इतर पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. पाथरी तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश उजगरे,तालुका अध्यक्ष दिनकर कदम, जिल्हा उपाध्यक्ष दिलिप मोरे, अवडाजी ढवळे, मंचक हारकळ, उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे, हरिभाऊ वाकानकर,अॅड अशोक पोटभरे यांच्यासह पदाधिकारी व सर्व पक्षिय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. तहसीवर काढण्यात आलेल्या मोर्चा वेळी प्रकाश उजगरे, रविंद्र धर्मे, काॅ. दिपक लिपने यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रशासनाला निषेधाचे निवेदन देण्यात आले.

वंचित बहुजन आघाडीच्या मानवत बंदला मोठा प्रतिसाद

मानवत : दिल्ली येथे शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यावर पोलिसांनी लाठीहल्ला केल्याच्या निषेधार्थ वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने गुरुवारी ता 23 पुकारण्यात आलेल्या मानवत शहर बंदला मोठा प्रतिसाद मिळाला.

नीट परीक्षा पेपर फुटीप्रकरणी दिल्ली येथे विदयार्थ्यांचे आंदोलन सुरु असून पोलिसांनी लाठीहल्ला केल्याच्या निषेधार्थ तसेच विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्या या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मानवत बंद चे आवाहन करण्यात आले होते. या बंदला काँग्रेस व शिवसेना उबाठा च्या वतीने पाठिंबा होता. अत्यावश्यक सेवा वगळता शहराची सर्व बाजारपेठ कडकडीत बंद राहिली. आंदोलनकर्त्यांनी तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांना मागण्याचे निवेदन सादर केले.

बंदच्या यशस्वीतेसाठी वंचित चे जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर कुमावत, धम्मपाल सोनटक्के, संपत पंडित महेंद्र ठेंगे आनंद भदर्गे दीपक ठेंगे वशिष्ठ मोरे मिलिंद मोरे बाळासाहेब कांबळे राजकुमार खरात मुकुंद मोरे दिलीप काकडे चंद्रकांत मगर गोविंद घांडगे व्यंकटेश चौधरी यांच्यासह काँग्रेसचे तालुका अध्यक्ष एडवोकेट रमेश जाधव, सेनेचे तालुकाध्यक्ष प्रभाकर कदम यांनी प्रयत्न केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news