Parbhani News | सोनखेड येथील रद्द पाणंद रस्ता कामात बोगस मजूर नोंदी; सखोल चौकशीची सरपंचांची मागणी

सरपंच मुक्ताबाई सूर्यवंशी यांचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, चुडावा पोलिस ठाण्याला निवेदन
Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Act, 2005
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (File Photo)
Published on
Updated on

Sonkhed Panand Road Cancellation

पूर्णा : पूर्णा तालुक्यातील सोनखेड (मोठी पांढरी) येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) रद्द झालेल्या पाणंद रस्ता कामासाठी कथितरीत्या बोगस मजूर नोंदी करून शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा अमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा ग्रामपंचायतीच्या सरपंच मुक्ताबाई सूर्यवंशी यांनी दिला आहे.

सरपंच मुक्ताबाई सूर्यवंशी यांनी २० जुलै रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी तसेच चुडावा पोलिस ठाण्याकडे निवेदन सादर केले आहे. या निवेदनात ग्रामरोजगार सेवकासह संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Act, 2005
Parbhani News : आरोग्‍य केंद्राला ५ वर्षांपासून कुटुंब कल्‍याण शस्‍त्रक्रिया शिबिराचा विसर

निवेदनानुसार, विश्वनाथ माणिकराव सूर्यवंशी यांच्या शेतापासून चुडावा शिव रस्त्यापर्यंतचा पाणंद रस्ता प्रशासनाने यापूर्वीच रद्द केला होता. मात्र, तोच रस्ता सुरू असल्याचे दाखवून ४८ मजुरांची ऑनलाइन नोंद करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित मजूर प्रत्यक्षात पंढरपूर यात्रेला गेले होते, काही नांदेड येथे तर काही बाहेरगावी असतानाही त्यांची उपस्थिती एका कथित बनावट ॲपच्या माध्यमातून नोंदविण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

तसेच, सरपंचांची परवानगी किंवा स्वाक्षरी न घेता कामाची प्रक्रिया राबविण्यात आली असून, शासनाचा निधी बोगस मस्टरच्या माध्यमातून काढण्याचा प्रयत्न झाल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणात संबंधित ग्रामरोजगार सेवक आणि सहभागी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करावे, तसेच कथित बोगस मस्टर व देयके रद्द करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Act, 2005
Parbhani News | परभणीत उपवर्गीकरण आंदोलनातील राज्यस्तरीय कार्यकर्त्याच्या घरावर मध्यरात्री हल्ला!

याशिवाय, चौकशी न झाल्यास सरपंच मुक्ताबाई सूर्यवंशी आणि ग्रामस्थ लवकरच अमरण उपोषणास बसतील, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. दरम्यान, या आरोपांमुळे सोनखेड परिसरात खळबळ उडाली असून, संबंधित प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news