चारठाणा; पुढारी वृत्तसेवा : संभाजीनगर-नांदेड राज्य महामार्गावरील चारठाणाजवळील पिपरी गीते येथे संभाजीनगरहून चारठाणाकडे येणाऱ्या दुचाकीला जिंतूर सेलूकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली. यात विठ्ठल राजेभाऊ अंभोरे (वय २८, रा. वाई, ता. सेलू) याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.१) दुपारी साडेचार वाजता घडली.
या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कापुरे, बीट जमादार दत्ता भदर्गे, सिद्धार्थ आचार्य यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रूग्णवाहिका चालक शेख इसाको दिन यांनी जखमीला जिंतूर येथील दवाखान्यात तात्काळ दाखल केले. दीक्षा विठ्ठल अंभोरे यांच्या फिर्यादीवरून दुचाकी चालक ज्ञानेश्वर रावसाहेब पोळ (रा. डिग्रस पोळ ता. सेलू) याच्यावर चारठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश कराड करीत आहेत.
हेही वाचा :