परभणी: कावलगाव येथे विवाहितेचा छळ; सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल | पुढारी

परभणी: कावलगाव येथे विवाहितेचा छळ; सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील कावलगाव येथील एका विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ करुन मारहाण करणे, माहेरहून पैसे आण म्हणून तगादा लावणे, या प्रकरणी पतीसह सासू, नणंदेवर चुडावा पोलिसांत आज (दि.२९) गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पूर्णा तालुक्यातील कावलगाव येथील मोनी उध्दव ईंगोले (वय २५) हिने चुडावा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे की, तिचा पती उध्दव नारायण ईंगोले, सासू कमलाबाई नारायण ईंगोले, नणंद वनिता सिध्दार्थ दुधमल (रा. एकदरा, जि. नांदेड), दुसरी नणंद सुनिता रावसाहेब भोरगे (रा. मारकंड, जि. नांदेड) यांनी संगनमत करुन फिर्यादीस तुला धुणे, भांडे येत नाही.

तसेच सेंट्रिंगच्या कामासाठी लागणाऱ्या प्लेटसाठी माहेरहून १ लाख रुपये घेवून ये, असे म्हणून शारीरीक व मानसिक त्रास देवून मारहाण केली. या प्रकरणी चुडावा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नरसिंग पोमनाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

हेही वाचा 

Back to top button