परभणी : जनशताब्दी एक्सप्रेसचे सेलू रेल्वे स्थानकात स्वागत | पुढारी

परभणी : जनशताब्दी एक्सप्रेसचे सेलू रेल्वे स्थानकात स्वागत

सेलू, पुढारी वृत्तसेवा : येथील रेल्वेस्थानकात नव्याने थांबा मिळालेल्या जनशताब्दी एक्सप्रेस रेल्वे गाडीचे, फटाक्यांची आतिषबाजी, ढोलताशांचा गजर, पुष्पवृष्टी व पेढे वाटप करून आज (दि.१४) भव्य स्वागत करण्यात आले. चालक गणेश विश्वकर्मा व प्रविण राऊत, तसेच गार्ड, टी.सी, स्टेशन मास्तर एस.एस.आर्या, किशोर चव्हाण, विवेक सिंग, बोनू रमेश, राजेश कुमार, अभिषेक कुमा, भोला कुमार व प्रथम प्रवासी कैलास कांचन यांचा मराठवाडा रेल्वे प्रवासी संघ व समस्त सेलूकरांच्या वतीने पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे मराठवाडा रेल्वे प्रवासी संघ, तेथील पत्रकार व लोकनेते यांनी सातत्याने जनशताब्दी एक्सप्रेस व इतर रेल्वे गाड्यांना सेलू स्थानकात थांबा मिळावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार जनशताब्दी एक्सप्रेसला प्रायोगिक तत्त्वावर सहा महिन्यांसाठी सेलू रेल्वे स्थानकात थांबा मंजुरी देण्यात आली आहे. प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद व उत्पन्न वाढ मिळाल्यानंतर हा थांबा कायम करण्यात येणार आहे.

यावेळी मराठवाडा रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष शिवनारायण मालाणी, सचिव प्रविण माणकेश्वर, नंदकिशोर बाहेती, मनिष कदम, आनंद बाहेती, कृष्णा काटे, भगवान पावडे, शेख मुनिर, वल्लभ राठी, अर्जुन बोरूळ, दिपक चव्हाण, श्यामसुंदर मालाणी, दिलीप सांगताणी, अतुल दातार, श्रीनिवास काबरा, जगन्नाथ पवार, डॉ राजेंद्र मुळावेकर, नंदलाल परताणी, एस.के.मंडलिक, शिवकुमार नावाडे, शंभु काकडे, मारोती भिसे, प्रकाश करवा, खलिल खान,ऐजाज पठाण, रामप्रसाद साबू, पवार,राजेंद्र सराफ, ऐड. विजय खारकर, रफिक अन्सारी,बद्रुद्दिन अन्सारी, सामाजिक कार्यकर्ते, मार्निंग वाॅक ग्रुप चे सर्व संचालक आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा :

Back to top button