कोल्हापूर: हॉटेलात धिंगाणा घालणे भोवले; भुदरगडचा सहाय्यक फौजदार निलंबित | पुढारी

कोल्हापूर: हॉटेलात धिंगाणा घालणे भोवले; भुदरगडचा सहाय्यक फौजदार निलंबित

गारगोटी: पुढारी वृत्तसेवा : हॉटेलचे बिल न देण्याच्या कारणावरून दारू पिऊन हॉटेलमध्ये धिंगाणा घातला. हे प्रकरण भुदरगड पोलीस ठाण्याच्या एका सहायक फौजदाराच्या अंगलट आले आहे. जिल्हा पोलीस प्रमुखांनी सहाय्यक फौजदारास तत्काळ निलंबित केले आहे. तानाजी रामचंद्र विचारे असे निलंबित फौजदाराचे नाव आहे.

3
गारगोटी पिंपळगाव रोडवरील धामणे फाट्यानजीक असलेल्या एका हॉटेलमध्ये सहायक फौजदार तानाजी विचारे बुधवारी सायंकाळच्या सुमारास जेवण्यासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर बिल देण्यास नकार देऊन हॉटेल मालकास मारहाण केली. तसेच मद्य प्राशन केलेल्या अवस्थेत जोरदार धिंगाणा घातला.

याबाबतची फिर्याद हॉटेल मालकाने भुदरगड पोलिसांत दाखल केली होती. याप्रकरणी भुदरगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी याबाबतचा अहवाल जिल्हा पोलीस प्रमुख यांना दिला. त्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुखांनी विचारे यास तातडीने निलंबित केले आहे.

हेही वाचा 

Back to top button