परभणी: गंगाखेडसह तालुक्यात भगरीतून २९ जणांना विषबाधा | पुढारी

परभणी: गंगाखेडसह तालुक्यात भगरीतून २९ जणांना विषबाधा

गंगाखेड, पुढारी वृत्तसेवा : मंगळवारी एकादशीच्या निमित्ताने शहर व ग्रामीण भागात उपवास ठेवणाऱ्या भक्तांना बुधवारी (दि.७) बनावट भगरीचा मोठा फटका सहन करावा लागला. शहर व तालुक्यातील २९ जणांना भगरीतून विषबाधा झाल्याचे निष्पन्न झाले. बुधवारी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात सर्व रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, परभणी जिल्ह्यासह मराठवाड्यात बनावट भगरीचे मोठे रॅकेट सक्रिय झाली आहे. पोलिसांसह अन्न व औषध प्रशासनाने याची गंभीर दखल घेण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

मंगळवारी एकादशी निमित्त शहर व तालुक्यात विविध धार्मिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने आयोजित महाप्रसाद महाप्रसादातून खाण्यात आलेल्या भगरीची विषबाधा भाविकांवर झाली. यामध्ये शहर व तालुक्यातील एकूण २९ जणांचा समावेश आहे. संबंधितांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.

अमित राजेभाऊ आढाव, सिंधू अमित आढाव, विष्णू गंगाराम आंधळे, बाबुराव बाबुराव शिंदे, कांताबाई केशवराव हंगरगे (सर्व ओमनगर, गंगाखेड) भानुदास पूरबाजी भडके (नागठाणा), विठ्ठलराव मसणाजी ठवरे, संतराम विठ्ठलराव लोखंडे, सखुबाई विठ्ठलराव ठवरे, केसरबाई संतराम देविदास, जळबा ठवरे, सोनाली मुंजा ठवरे, मुंजा देविदास ठवरे (सर्व विठ्ठलवाडी), अनिता शिवगीर गिरी (रावराजुर तालुका पालम), सरस्वती रामेश्वर कुंडगीर (शेंडगा तालुका गंगाखेड), अलका हनुमान कोंडगिर (शेंडगा), देवईबाई प्रल्हाद कोरडे (सारडा कॉलनी) प्रल्हाद गंगाराम कोरडे (सारडा कॉलनी), साहेबराव सोपानराव लोखंडे (विठ्ठलवाडी) सूर्यकला दगडोबा हंडेकर (जायकवाडी) सावित्रीबाई साहेबराव लोखंडे (विठ्ठलवाडी) लिंबाजी भोळाराम ठवरे उर्मिलाबाई नागोराव ठवरे, उषा लिंबाजी ठवरे (सर्व विठ्ठलवाडी), सुनिता रोहिदास भोसले, रोहिदास त्र्यंबक भोसले, शितल भागवत भोसले (सर्व प्राध्यापक कॉलनी गंगाखेड), छाया बालाजी लोखंडे, बालाजी अंसाराम लोखंडे (राहणार विठ्ठलवाडी) यांचा विषबाधा झालेल्या रुग्णांमध्ये समावेश आहे.

उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी सर्वांवर तातडीने उपचार करुन रुग्णांच्या रक्ताचे नमुने व भगरीचे पॅकिंग पाऊच व इतर नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याचे उपचार करणारे डॉ. पी. आर. चट्टे यांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच गंगाखेडचे पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे व गुप्त वार्ता शाखेचे सपोउनि प्रकाश रेवले यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेत रुग्णांची भेट घेऊन भगरीचे पॅकिंग ताब्यात घेतले.

नांदेड, सोन्ना (परभणी) सह गंगाखेड शहर व तालुक्यात भगरीतून विषबाधा मोठ्या प्रमाणात झाल्याचे पुढे आले आहे. दरम्यान, मराठवाड्यात बनावट भगर विक्रीचे मोठे रॅकेट सक्रिय झाल्याची दाट शक्यता असून पोलिसांसह अन्न व औषध प्रशासनाने याची वेळीच दखल घ्यावी अशी मागणी जोर धरत आहे.

हेही वाचा 

Back to top button