परभणी : गणपूर-सुकी कॅनॉलमध्ये सापडला युवकाचा मृतदेह

परभणी : गणपूर-सुकी कॅनॉलमध्ये सापडला युवकाचा मृतदेह

पूर्णा; पुढारी वृत्तसेवा : तालूक्यातील गणपूर-सुकी शेत शिवारात‌ असलेल्या जायकवाडी धरणाच्या कॅनॉलमधील वाहत्या पाण्यात एका २१ ते २२ वर्षीय अनोळखी युवकाचा मृतदेह आढळला. मंगळवारी (दि.६) दुपारी पूर्णा पोलीसांना तेथील पथदर्शी नागरीकांनी माहीती दिल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून सदर मयत युवकाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. मयत युवक अर्धनग्न आणि कपडे फाटलेल्या अवस्थेत होता. मयत युवकाचे शवविच्छेदन करण्यात येवून मृत्यूची नोंद पूर्णा पोलीसात करणे चालू होती. सदरील युवकाची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत आसून आत्महत्या की खून? या प्रश्नाची उकल तपासानंरच होईल असे नागरीक सांगत आहोत.या घटनेमुळे गणपूर-सुकी-ममदापूर परिसरात भितीचे वातावरणात निर्माण झाले आहे.या घटना प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सबंधीत पोलीस जमादार व कर्मचारी करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news