परभणी: जिंतूर तहसिल कार्यालयापुढे तहसीलदारांच्या गाडीला आग | पुढारी

परभणी: जिंतूर तहसिल कार्यालयापुढे तहसीलदारांच्या गाडीला आग

जिंतूर, पुढारी वृत्तसेवा: जिंतूर तहसिल कार्यालयापुढे उभी केलेल्या तहसीलदारांच्या गाडीने (एम.एच.22 डी-1011) अचानक पेट घेतला. ही घटना आज (दि.२८) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. यामुळे कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली.

दरम्यान, हाकेच्या अंतरावर असलेल्या पालिकेच्या अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. तोपर्यंत गाडीचा समोरील बहुतांशी भाग जळून खाक झाला. गाडीला कशामुळे आग लागली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

हेही वाचा 

Back to top button