मराठा आंदोलकांच्या पायीदिंडीमुळे नवी मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत बदल | पुढारी

मराठा आंदोलकांच्या पायीदिंडीमुळे नवी मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत बदल

नवी मुंबई; पुढारी वृतसेवा : मराठा आंदोलकांची पायीदिंडी नवी मुंबईत गुरूवारी (दि. २५) दाखल होणार असल्याने नवी मुंबईतून वाहतुक विभागातील एक अधिकारी आणि तीन कर्मचारी यांनी पुण्यात जरांगे पाटील यांची भेट घेऊन आंदोलन पायी दिंडीचा मार्गाची माहिती घेतली.त्यानंतर वाहतुकीत बदल करण्यात आला.

नवी मुंबईत कुठेही वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी नवी मुंबई वाहतूक विभागाकडून वाहतुकीत बदलचा निर्णय घेतला आहे. यावेळी वाहतूक कोंडी होवू नये म्हणून एपीएमसी वाहतूक शाखेच्या परिसरातील पुढील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असून वाहतूक दुस-या मार्गाने वळवण्यात आली आहे.

१. तुर्भे उड्डाणपूल ते वाशीतील छत्रपती शिवाजी चौकापर्यंतचा दोन्ही बाजूंचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
सदर वाहनांना पनवेल-सायन मार्गाने वाशी प्लाझा येथून निश्चित स्थळी जाता येईल.
२. महापे पावणे पूल कोपरखैरणेकडून येणारी सर्व वहाने पामबीच रोडने अरेंजा सिंग्नल मार्गे निश्चत स्थळी जातील; मात्र अरेंजा सिग्नलकडून तुर्भेकडे जाणारा मार्ग बंद करण्यात येणार आहे. तसेच पामबीच रोडवरील सीबीडी बेलापूर मार्गावरील कोपरी ते अरेजा सिग्नलचे दरम्यान एपीएमसी मार्केटकडे येणारे सर्व मार्गावर प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
३. अन्नपूर्णा सिंग्नल, माथाडी सिग्नलकडून पुनित कॉर्नर मार्गाकडे वळून कोपरीकडे जाणारे तसेच सरळ बोनकडेकडे जाणा-या सर्व वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येणार आहे. पर्यायी रस्ता म्हणून से. २६ मधील अंतर्गत रस्त्यांचा वापर करावा.
४. बोनकडे सिग्नलकडून पुनित कॉर्नर मार्ग माथाडी भवनकडे येणा-या सर्व वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. त्यांकरीत पर्यायी मार्ग पुनीत कॉर्नर येथून उजवीकडे ओळून निश्चित स्थळी जातील.
५. एव्हलॉन स्कुल चौकातुन एपीएमसीकडे येणारा व जाणारा दोनही मार्गावर प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
६. सानपाडा रेल्वे स्थानकासमोरील पूल ते एपीएमसी सिग्नलकडे जाणारे व येणारे दोन मार्ग बंद करण्यात येणार आहेत.
७. से. २० तुर्भे मार्गे माथाडी भवनकडे येणा-या सर्व वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
८. दक्षिण मुखी हनुमान मंदिर चौक येथे जनता मार्केटकडून सर्व्हिस रोडने ये-जा करणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

Back to top button