

मानवत पुढारी वृत्तसेवा, कापुस हंगाम सन २०२३-२४ करीता मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर कापूस खरेदी सुरू होणार. याबद्दलची माहिती बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर यांनी दिली. मानवतच्या सभागृहामध्ये आज (दि.७) सभापती पंकजराव आंबेगावकर व कापूस खरेदीदार व्यापारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.बैठकीमधे बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्डात दिपावली पाडव्याच्या दिवशी लिलावाची कापूस खरेदी सुरू करण्याचे ठरविण्यात आले आहे.
या वेळी बाजार समितीचे सभापती पंकज जाधव आंबेगावकर, उपसभापती नारायण भिसे, संचालक जुगलकिशोर काबरा, ज्ञानेश्वर मोरे, रामेश्वर जाधव, बाजार समितीचे सचिव शिवनारायण सारडा, व्यापारी युनुसभाई, जयप्रकाश पोरवाल, गिरीष कत्रुवार, राहुल कडतन, परमेश्वर गोलाईत, रामनिवास सारडा, अमित पटेल, जलालभाई, सागर मुंदडा उपस्थित होते. बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले की, आपला कापुस मंगळवार (दि.१४) पासुन लिलाव पद्धतीने विक्रीकरीता आणावा, तसेच आपण विक्री केलेल्या कापसाचे पेमेंट २४ तासाच्या आत घ्यावे, पेमेंट २४ तासाच्या आत न मिळाल्यास रितसर बाजार समितीकडे तक्रार ७ दिवसांच्या आत करावी. सात दिवासांनंतर पैसे न मिळाल्याची तक्रार बाजार समितीमार्फत स्विकारली जाणार नाही याची नोंद घ्यावी कोणत्याही शेतकऱ्याने अनामत कापुस विक्री करू नये. असे आवाहण या समिती मार्फत करण्यात आले आहे.
हेही वाचा