परभणी : मानवत पालिकेने ४ दुकानांना ठोकले सील, साडेतीन लाखांची थकबाकी वसूल | पुढारी

परभणी : मानवत पालिकेने ४ दुकानांना ठोकले सील, साडेतीन लाखांची थकबाकी वसूल

मानवत; पुढारी वृत्तसेवा : मालमत्ताकर, दुकान भाडे, नळपट्टी आदी थकीत कराची वसुली करण्यासाठी मानवत नगरपालिका प्रशासनाच्या वतीने बुधवारी (दि.४) धडक वसुली मोहिम राबविण्यात आली. यात साडेतीन लाखाची वसुली करण्यात आली असून गाळे भाडे न भरणाऱ्या ४ दुकानांना पालिकेकडन सील ठोकण्यात आले.

नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे यांनी विशेष वसुली मोहीम राबविली. मुख्याधिकारी या स्वतः वसुलीसाठी रस्त्यावर उतरल्या. वसुलीच्या बाबतीत त्यांनी कडक पवित्रा घेतला असून शहरातील सर्व नागरिकांनी थकीत घरपट्टी, नळपट्टी, जमीन भाडे, गाळा भाडे, भरून नगर परिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. नगरपरिषदेच्या हद्दीतील प्रभाग निहाय डोअर टू डोअर वसुली मोहीम राबविण्यात येणार आहे, असे मुख्याधिकारी सावरे यांनी सांगितले. बुधवारी केलेल्या कारवाईत चार दुकानांना सील ठोकले असून एकूण तीन लाख ४० हजार रूपयांची कर वसुली केली आहे.

या वसुली मोहिमेत नगर परिषदेचे कर्मचारी अन्वर सय्यद, संतोष उन्हाळे, भगवान शिंदे, वंदना इंगोले, एकनाथ जाधव, मंगेश खोडवे, अमोल तांदळे, हनुमंत बिडवे, शताणिक जोशी, संतोष खरात आदी सामील झाले होते.

हेही वाचा : 

Back to top button