जिंतूर; पुढारी वृत्तसेवा : सोमवारी (दि. १४) जिंतूर येथील मार्केट यार्ड मध्ये झालेल्या जाहीर लिलावात सोयाबीनला ६०५१ रु प्रतिक्विंटल इतका भाव मिळाला. मार्केट यार्ड येथे झालेल्या सोयाबीन लिलावात कमीत कमी ५३८० रु व जास्तीत जास्त ६०५१ रु व सरासरी दर ५७०० रु प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला. दरम्यान सोयाबीनची एकूण आवक १२७८ क्विंटल एवढी झाली होती. तसेच हळद १४ क्विंटल आवक होऊन सरासरी दर ५२०० प्रति क्विंटल इतका दर मिळाला. (Parabhani)
सर्व शेतकऱ्यांनी आपला माल मार्केट यार्ड जाहीर लिलावद्वारेच विक्री करावा जेणेकरून आपल्या शेतीमालाला जास्तीत जास्त भाव मिळेल. तसेच आर्थिक फसवणूक देखील होणार नाही. तसेच शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्री संबंधित तक्रार बाजार समितीकडे द्यावी असे आवाहन प्रशासक एम.ए. भोसले व सचिव सतीश काळे यांनी केले. (Parabhani)
हेही वाचा