उस्मानाबाद : तलवारीचा वार करून बार चालकास लुटले, पोलीस अधिकारी जखमी

crime
crime

कळंब, पुढारी वृत्तसेवा : शहरातील बार्शी रोडवरील सम्राटबारमध्ये बारचालकाला धाक दाखवून ३६०० रूपये लुटण्याची घटना घडली. बुधवारी (दि. ५ ऑक्टो) ही घटना घडली.

याबाबत अधिकची माहिती अशी की, अश्रूबा कस्पटे हे दि. ५ ऑक्टोबर रोजी काउंटर समोर बसले होते. त्यावेळी कन्हेरवाडी येथील नाना भास्कर काळे, हरि भास्कर काळे, कालिदास काळे, राहूल काळे, नाना काळे, अमोल नाना काळे, राजू कालिदास काळे, अश्विन सुभाष काळे या ८ जणांनी अश्रूबा कस्पटे यांना तलवारीचा धाक दाखवून दारूच्या ८ सिलबंद बाटल्या व रोख ३६०० रक्कम लुटून नेले.

अश्रूबा कस्पटे यांनी प्रतिकार केला असता आरोपींनी त्यांच्या डोक्यात उलट्या तलवारीने वार करुन जखमी केले. घटनास्थळी कळंब पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण नेहरकर व त्यांचे पथक दाखल होताच लुटारु चारचाकी वाहनातून पसार झाले. पोलीस पथकाने अश्रूबा कस्पटे यांना सोबत घेऊन पाठलाग करून आंदोरा शिवारात त्यांना गाठण्याचा प्रयत्न केला असता त्यांना दगडफेक करून सहाय्यक पोलीस निरीक्षक नेहरकर यांना जखमी केले. याकरणी अश्रुबा कसपटे यांनी कळंब पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

या प्रकरणी भास्कर काळे, हरी मास्कर काळे, कालिदास भास्कर काळे, राहूत नाना काळे, अमोल नाना काळे, राजू कालिदास काळे, आश्विन सुभाष काळे (रा. कन्हेरवाडी ता. कळंब) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्लेखोरांतील नाना काळे यास अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news