Rohit Pawar : शासनाची पाच हजारांची मदत म्‍हणजे शेतकऱ्यांची थट्टाच!

आ. रोहित पवार यांनी घेतली क्षीरसागर यांच्‍या मुलीच्‍या शिक्षणाची जबाबदारी
Maharashtra Drought Relief
Rohit Pawar pudhari photo
Published on: 
Updated on: 

नांदेड : राज्‍य सरकारने दुष्काळग्रस्‍त शेतकऱ्यांना जाहीर केलेली पाच हजारांची मदत अत्‍यंत तोकडी असून ही मदत म्‍हणजे शेतकऱ्यांची सरकारने केलेली थट्टाच आहे, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे आ. रोहित पवार यांनी केला.

नांदेड तालुक्‍यातील बोरगाव येथील शंकर क्षीरसागर या शेतकऱ्याने आत्‍महत्‍या केल्‍याच्‍या पार्श्वभूमीवर आ. रोहित पवार यांनी त्‍यांच्‍या कुटुंबीयांची भेट घेऊन त्‍यांचे सांत्‍वन केले. यावेळी त्‍यांनी शेतकरी क्षीरसागर यांच्‍या आत्‍महत्‍येविषयी तसेच त्‍यांच्‍यावरील कर्जाबाबत महसूल विभागाकडून माहिती घेतली.

Maharashtra Drought Relief
Beed Crime : ‘इकोसँड’च्या आडून अवैध वाळू वाहतूक

त्‍यानंतर त्‍यांनी नांदेड येथे पत्रकार परिषद घेऊन राज्‍य सरकारच्‍या शेतकरी धोरणांबाबत नाराजी व्‍यक्‍त करीत त्‍यांनी सरकारवर हल्‍लाबोल केला. यावेळी खा. रवींद्र चव्‍हाण, डॉ. माधवराव किन्‍हाळकर यांची उपस्‍थिती होती.

पुढे बोलताना ते म्‍हणाले, राज्‍य सरकार शेतकरीविरोधी धोरण राबवित आहे. एकीकडे राज्‍यात मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडलेला आहे. त्‍यामुळे शेतकऱ्यांच्‍या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा परिस्‍थितीत शेतकऱ्यांच्‍या लागवडीचा खर्चही निघणे अवघड झाले आहे. राज्‍यात एवढा मोठा दुष्काळ असताना शासन शेतकऱ्यांना अवघी पाच हजारांची तोकडी मदत जाहीर करण्यात आली.

Maharashtra Drought Relief
Tuljapur Tulja Bhavani Temple : हजारो भाविकांच्या उपस्थितीत तुळजाभवानी मातेचे सीमोल्लंघन

दरम्‍यान, मुख्यमंत्री जे चॉकलेट खातात त्‍या चॉकलेटची किंमत दोन हजार रुपये आहे, असे सांगत त्‍यांनी चॉकलेटसुध्दा महागले आहे, याची जाणिव सरकारला यायला हवी, स्‍वतः चॉकलेट खाणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना ही तोकडी मदत देऊन चॉकलेट देऊन शेतकऱ्यांची चेष्टा केल्‍याची टीका आ. रोहित पवार यांनी केली.

यावेळी माजी आ. ईश्वरराव भोसीकर, काॅंग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. यशपाल भिंगे, राष्ट्रवादीच्या पदवीधर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, आदिवासी सेलचे प्रदेशाध्यक्ष जयवंत वानोळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर, तातेराव पाटील आलेगावकर आदींची उपस्‍थिती होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news