Nanded Gambling Raid | कुंटूर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; पाच जणांवर गुन्हा

३ लाख १३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; दुचाकी, मोबाईलसह रोकड हस्तगत
Nanded Naigaon Gambling Raid
Nanded Naigaon Gambling RaidPudhari
Published on
Updated on

Nanded Naigaon Gambling Raid

नायगाव : नायगाव तालुक्यातील सुजलेगाव शेतशिवारात सुरू असलेल्या ‘तिर्रट’ जुगार अड्ड्यावर कुंटूर पोलिसांनी छापा टाकून पाच जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, दुचाकी, मोबाईल आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ३ लाख १३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

नांदेड जिल्ह्यातील जुगार, मटका आणि अन्य अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत ८ ऑगस्ट रोजी कुंटूर पोलिसांनी ही कारवाई केली.

Nanded Naigaon Gambling Raid
Nanded Crime : आईची हत्या करून मुलाने स्वतःही घेतला गळफास

कुंटूर पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना सुजलेगाव शेतशिवारात काही जण ‘तिर्रट’ नावाचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिस निरीक्षक भोसले यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने पंचांसमक्ष घटनास्थळी छापा टाकला. त्यावेळी संशयित जुगार खेळताना आढळून आले.

पोलिसांनी रवीराज उत्तम जुकरे (२७, रा. सुगाव, ता. देगलूर), सुनील माधवराव उच्ये (२५, रा. करे मलकापूर, ता. देगलूर), साईराज पी. रामकिशन कदम (२९), अभिषेक हंगे (२७) आणि लक्ष्मण किशनराव तरकंटे (३३), तिघेही रा. सुजलेगाव, ता. नायगाव, यांना ताब्यात घेतले.

Nanded Naigaon Gambling Raid
Nanded News : भाजप जिल्हाध्यक्षांचे अधिकार गोठवले !

कारवाईत २१ हजार ७०० रुपये रोख, दोन मोटारसायकली व एक बुलेट असा २ लाख २० हजार रुपयांचा वाहनसाठा, चार मोबाईल (७२ हजार रुपये) तसेच जुगाराचे साहित्य, असा एकूण ३ लाख १३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी कुंटूर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २०३/२०२६, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने व सहाय्यक पोलिस निरीक्षक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ कांबळे, पवार, सप्रिल हंबर्डे तसेच कुंटूर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी केली.

Nanded Naigaon Gambling Raid
Nanded News : नांदेड जिल्हा बँकेमध्ये आज अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड !

अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले

जुगार, मटका, अवैध दारू, अमली पदार्थ आणि अन्य अवैध धंद्यांविरोधात नांदेड जिल्हा पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. नागरिकांनी आपल्या परिसरात अशा प्रकारचे अवैध प्रकार आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news