Nanded Crime : आईची हत्या करून मुलाने स्वतःही घेतला गळफास

नांदेड शहरातील घटना : मानसिक तणावातून पोटच्या मुलानेच उचलले टोकाचे पाऊल
Nanded Murder
आईची हत्या करून मुलाने स्वतःही घेतला गळफासPudhari File Photo
Published on
Updated on

Nanded Crime: Son kills mother, then hangs himself

नांदेड, पुढारी वृत्तसेवा शहरात शनिवारी एकामागून एक घडलेल्या खुनाच्या घटनांमुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. अवघ्या २४ तासांच्या आत शहरात खुनाचे तीन प्रकार घडले असून, एका आत्महत्येसह एकूण चार जणांचा मृत्यू झाला. या सर्व घटनांमध्ये तरोडा खुर्द परिसरातील राहुल कॉलनी येथे घडलेली घटना सर्वाधिक मन सुन्न करणारी ठरली आहे. तीव्र मानसिक तणावात असलेल्या एका पोटच्या मुलाने आपल्या जन्मदात्या आईचा लोखंडी रॉड आणि बॅटने मारहाण करून निघृण खून केला आणि त्यानंतर स्वतः ही गळफास घेऊन आयुष्य संपवले.

Nanded Murder
Nanded Crime : दुहेरी खुनांच्या घटनेने नांदेड हादरले; २४ तासांत दोन तरुणांची हत्या

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल कॉलनी येथील रहिवासी बालाजी सोपान चौथरे हे भारतीय सैन्य दलात (सीआरपीएफ) कार्यरत आहेत. त्यांची मुलगी प्राची शिक्षणासाठी पुण्यात असते, तर घरी पत्नी भारती बालाजी चौथरे (वय ५०) आणि मुलगा प्रतीक बालाजी चौथरे (वय २६) हे दोघेच राहत होते.

शनिवारी (८ ऑगस्ट) सायंकाळी ७ते ९ वाजेच्या सुमारास प्रतीकने आई भारती यांच्यावर घरातील लोखंडी रॉड आणि बॅटने अचानक प्राणघातक हल्ला केला. हा हल्ला इतका भीषण होता की, भारती यांचा रक्ताच्या थारोळ्यात जागीच मृत्यू झाला. आईची हत्या प्रतीकने केल्यानंतर घरातील बाथरूमसमोरील स्लॅबच्या हुकाला साडीने गळफास लावून आत्महत्या केली.

Nanded Murder
Nanded Crime : स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू होता वेश्याव्यवसाय; नांदेडमध्ये पोलिसांची धडक कारवाई

बराच वेळ घरून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने नातेवाईकांनी खिडकीची काच फोडून आत पाहिले असता, समोरचे दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. एका बाजूला आईचा रक्ताने माखलेला मृतदेह आणि दुसऱ्या बाजूला मुलाचा लटकणारा देह असे काळीज पिळवटून टाकणारे दृश्य समोर आले.

या घटनेची माहिती मिळताच भाग्यनगर पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. प्राथमिक तपासात ही घटना तीव्र मानसिक तणावातून घडल्याचे समोर आले आहे. प्रतीक हा गेल्या ५ ते ६ वर्षापासून गंभीर नैराश्यामध्ये (डिप्रेशन) होता आणि त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते.

उपचार सुरू असतानाच त्याने हे अत्यंत टोकाचे पाऊल उचलले. या दुर्दैवी आणि अंगावर काटा आणणाऱ्या घटनेमुळे तरोडा परिसर आणि संपूर्ण नांदेड शहरावर शोककळा पसरली असून, वाढत्या मानसिक आरोग्याच्या समस्येवर हे एक अत्यंत भयानक उदाहरण समोर आले आहे. भाग्यनगर पोलीस पुढील तपास करत आहेत.

शहरातील खुनाची तिसरी घटना

शहरात शनिवारी एकामागून एक घडलेल्या खुनाच्या दोन घटनांनी संपूर्ण जिल्हा हादरला. या दोन्ही घटना ताज्या असतानाच पुन्हा रविवारी पोटच्या मुलानेच जन्मदात्या आईचा लोखंडी रॉड आणि बॅटने अमानुषपणे मारहाण करून निघृण खून केला. आणि त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आयुष्य संपवल्याची घटना उघडकीस आली. या सततच्या खूनाच्या घटनांनी शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. लागोपाठ तिसऱ्या खूनाच्या घटनेने विशेषतः आईचाच खून करणे म्हणजे समाज कोणत्या दिशेने वाटचाल करीत आहे. हा समाजमनाला विचार करायला लावणारा मोठा गहन प्रश्न आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news