Nanded Hyderabad Expressway | नायगाव तालुक्यातून एक्सप्रेस वे जाणार? सोशल मीडियावरील नकाशामुळे चर्चेला उधाण

सर्वेक्षणासाठी सल्लागार कंपनी नियुक्तीचा प्रस्ताव
Viral Map Nanded Hyderabad
Viral Map Nanded Hyderabad Pudhari
Published on
Updated on

Viral Map Nanded Hyderabad

नायगाव : प्रस्तावित नांदेड–हैदराबाद द्रुतगती मार्ग नायगाव तालुक्यातून जाणार असल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या एका नकाशात हा मार्ग तालुक्यातील महत्त्वाच्या पट्ट्यातून जात असल्याचे दिसत असल्याने नागरिक, शेतकरी व व्यापारी वर्गात उत्सुकता निर्माण झाली आहे. या मार्गामुळे तालुक्यातील अनेक गावे राज्य व आंतरराज्य दळणवळणाच्या मुख्य प्रवाहाशी जोडली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

या प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) मार्फत प्राथमिक सर्वेक्षण व सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यासाठी सल्लागार अभियांत्रिकी कंपनी नियुक्त करण्याचा प्रस्ताव आहे. संबंधित कंपनीकडून भू-सर्वेक्षण, वाहतूक घनता, पर्यावरणीय परिणाम आणि अंतिम मार्गनियोजन यांचा सविस्तर अभ्यास केला जाणार आहे.

Viral Map Nanded Hyderabad
Hyderabad Viral Video | मंदिरासमोर मुस्लिम तरुणाचं किळसवाणे कृत्य, जमावाने चोपला; व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ

पश्चिम–दक्षिण भागातून संभाव्य मार्ग

उपलब्ध माहितीनुसार, प्रस्तावित द्रुतगती मार्ग नायगाव तालुक्याच्या पश्चिम–दक्षिण भागातून प्रवेश करून पूर्वेकडे सरकतो. कहाळा परिसरापर्यंत तो नांदेड रोडला समांतर जात असून पुढे सोमठाणा, हिपरगा (जा.), रानसुगाव, लालवंडी, बेंद्री, गोळेगाव, खडगाव, होटाळा, कंडाळा, धानोरा, कुंचेली, शेळगाव आणि टाकळी या गावांच्या शिवारांना स्पर्श करत देगलूर तालुक्याकडे आणि पुढे तेलंगणा राज्याच्या दिशेने जात असल्याचे नकाशातून दिसते.

या मार्गावर इंटरचेंज प्रस्तावित झाल्यास नायगाव, मांजरम आणि बरबडा परिसराला थेट द्रुतगती मार्गाचा लाभ मिळू शकतो.

शेती, उद्योग आणि रोजगाराला चालना

या प्रकल्पामुळे —

  • शेतीमालाची नांदेड व हैदराबाद बाजारपेठेत जलद वाहतूक शक्य होणार

  • पेट्रोल पंप, वेअरहाऊस, लॉजिस्टिक पार्क आणि हॉटेल व्यवसायाला संधी निर्माण होणार

  • बांधकाम व सेवा क्षेत्रात स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता

Viral Map Nanded Hyderabad
Hyderabad Road Name After Trump: हैदराबाद मधील रस्त्याला डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव... हैदराबादचे नाव भाग्यनगर करा, भाजपची मागणी

जमीन अधिग्रहणाबाबत अपेक्षा

मार्गासाठी काही गावांतील शेती जमीन संपादित होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांकडून योग्य मोबदला, पारदर्शक प्रक्रिया, पुनर्वसनाची हमी आणि स्थानिकांना रोजगारात प्राधान्य देण्याची मागणी होत आहे. सध्या प्राथमिक सर्वेक्षण टप्प्यात असून अंतिम अधिसूचनेनंतरच मार्गाची निश्चित रूपरेषा स्पष्ट होणार आहे.

प्रकल्पाचा कालावधी ४ ते ५ वर्षे?

तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, DPR व प्रशासकीय मंजुरीसाठी सुमारे १ ते १.५ वर्षे, जमीन अधिग्रहणासाठी १ ते २ वर्षे आणि प्रत्यक्ष बांधकामासाठी २ ते ३ वर्षे असा कालावधी लागू शकतो. त्यामुळे संपूर्ण प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अंदाजे ४ ते ५ वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे.

Viral Map Nanded Hyderabad
Hyderabad Balloon: हैदराबाद बलूनचा प्रवास अहिल्यानगरच्या आकाशातून होण्याची शक्यता

नांदेड–हैदराबाद प्रवासाचा वेळ कमी होण्यासोबतच नायगाव तालुका भविष्यात लॉजिस्टिक आणि गुंतवणुकीचे केंद्र म्हणून विकसित होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. एकूणच, प्रस्तावित द्रुतगती मार्ग हा तालुक्याच्या विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो, अशी चर्चा परिसरात रंगत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news