

Hyderabad Road Name After Trump: तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी हैदराबादमधील एका मुख्य रस्त्याला अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. रेड्डी यांच्या या निर्णयामुळं भारताचच नाही तर अख्या जगाचं लक्ष वेधलं गेलं आहे. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार तेलंगणा रायझिंग ग्लोबल समीट या आंतरराष्ट्रीय इव्हेंटपूर्वी घडला आहे.
हैदराबाद मधील ज्या रस्त्यावर युएस काउन्सिलेट जनरलची इमारत आहे त्या रोडचं नाव आता डोनाल्ड ट्रम्प एव्हेन्यु असं ठेवण्यात येणार आहे. अधिकाऱ्यांच्या मते अमेरिकेचे विद्यमान अध्यक्षांचा जागतिक स्तरावरील हा असा प्रकराचा पहिला सन्मान असणार आहे.
राज्य सरकारचा हा रस्त्यांना नावं देण्याचा निर्णय राजकारणापलिकडचा आहे. ज्या उद्योगांमुळे हैदराबादला टेक हब हा टॅग मिळाला आहे त्यांचा सन्मान करणं हा यामागचा उद्येश आहे. या नव्या रस्त्यांच्या नावांमध्ये गुगल स्ट्रीट, मायक्रोसॉफ्ट, विप्रो जंक्शन यांचा देखील समावेश आहे.
अनेक उद्योगपतींची नावे
त्याचबरोबर होऊ घातलेल्या फ्युचर सिटीला पद्म भूषण रतन टाटा यांचे नाव देण्याचा देखील राज्य सरकारनं निर्णय घेतला आहे. रवीरयला इंटरचेंजला आधीच टाटा इंटरचेंज असं नाव देण्यात आलं आहे.
मुख्यमंत्री रेड्डी यांनी शहरातील महत्वाच्या रस्ते आणि चौकांना जागातील प्रभवाशाली व्यक्तींची नावे देण्यामागं दोन उद्येश असल्याचं सांगितलं. त्यांनी या प्रभावशाली व्यक्तींचा योग्य तो सन्मान करणे, त्यांच्या प्रेरणेचा आदर्श सर्वांसमोर ठेवणे याचबरोबर हैदराबादला जागतिक स्तरावर मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न करणे याचा समावेश आहे.
भाजपची टीका
दरम्यान, केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते बंडी संजय कुमार यांनी रेड्डी यांच्या या निर्णयावर टीका केली आहे. हैदराबद शहराचे नाव पुन्हा भाग्यनगर व्हावे अशी मागणी देखील त्यांनी केली.
एक्सवर पोस्ट करून संजय कुमार म्हणाले, 'काँग्रेसला जर नावं बदलण्याची इतकीच इच्छा आहे तर त्यांनी त्याची सुरूवात इतिहास आणि अर्थपूर्ण नावं देऊन करावी. ते म्हणाले की, राज्य सरकारला प्रश्न विचारणारी आणि लोकांचे खरे प्रश्न महा आंदोलन करून समोर ठेवणारा एकमेव पक्ष म्हणजे भाजप.'