Meera Borwankar : बोरवणकर न्यूझीलंडमध्ये;अफवा संबंध महाराष्ट्रात!

नियुक्तीसंदर्भातील चर्चेचे स्पष्टपणे खंडन
Meera Borwankar
Meera Borwankarpudhari photo
Published on
Updated on

विशेष प्रतिनिधी

नांदेड ः राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी माझी नियुक्ती झाली, ही अफवा असून मी सध्या उन्हाळी सुट्टीत न्यूझीलंडमध्ये असल्याचे डॉ.मीरा बोरवणकर यांनी कळविले आहे. वरील पदाची जबाबदारी स्वीकारण्यासंदर्भात आपल्याला राज्य शासनाकडून विचारणा झालेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या वादग्रस्त नेत्या रूपाली चाकणकर यांनी गेल्या महिन्यात महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. या रिक्त जागेवर कोणाची नियुक्ती होणार, याबद्दल वेगवेगळ्या नावांची चर्चा होत असतानाच महाराष्ट्र पोलीस दलात आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमुळे गाजलेल्या निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ.बोरवणकर यांची वरील पदावर नियुक्ती झाल्याचे समाजमाध्यमांतून समोर आले.

Meera Borwankar
women empowerment | स्त्री शक्ती सक्षमीकरणाची नवी दिशा

गेल्या सोमवारी दूपारनंतर पश्चिम बंगाल व अन्य राज्यांतील निवडणूक निकालांचे तपशील आणि अन्य माहिती सर्वत्र येत असताना महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये बोरवणकर यांच्या कथित नियुक्तीची माहिती समाजमाध्यमांतून फैलावली गेली.

या पार्श्वभूमीवर बोरवणकर यांच्याशी अनेकांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण त्या संपर्क क्षेत्राबाहेर असल्याचे भ्रमणध्वनीवरून स्पष्ट होत होते. मंगळवारीही त्यांच्याशी थेट संवाद होऊ शकला नाही; पण आपण महिला आयोगासंबंधी विचारणा करणार असाल, तर ती अफवा आहे. मी उन्हाळी सुट्टीनिमित्त न्यूझीलंडमध्ये आले असल्याचा संदेश त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीस पाठविला. त्यावरून महिला आयोगाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली नाही, हे स्पष्ट झाले.

Meera Borwankar
MP Pappu Yadav | '९० % महिला नेत्या बेडरुममधूनच...'; खासदाराचे अत्यंत खालच्या पातळीवरचं विधान

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news