MP Pappu Yadav | '९० % महिला नेत्या बेडरुममधूनच...'; खासदाराचे अत्यंत खालच्या पातळीवरचं विधान

MP Pappu Yadav | भारतात महिलांचे शोषण करणे हे जणू धोरणच बनले आहे
खासदार पप्‍पू यादव
खासदार पप्‍पू यादव Pudhari
Published on
Updated on

Pappu Yadav controversial statement

पाटणा : राजकीय नेते आणि वादग्रस्त विधान हे समीकरण पक्के आहे. वादग्रस्त विधानांसाठी तर देशातील उत्तर पट्ट्यातील नेत्यांमध्ये तर स्पर्धाच सुरू असते. आता राजकारणात सक्रिय असणाऱ्या महिलांविषयी अत्यंत खालच्या पातळीवर विधान बिहारमधील पूर्णियाचे अपक्ष खासदार पप्पू यादव यांनी केले आहे.

'९०% महिला नेत्या बेडरूममधूनच...'

प्रसारमाध्यमांशी बोलताना पप्पू यादव म्हणाले, बहुसंख्य महिलांना "तडजोड" केल्याशिवाय राजकारणात प्रवेश करणे किंवा यशस्वी होणे अशक्य आहे. पुरुष राजकारण्यांकडून महिलांचे शोषण मोठ्या प्रमाणावर होत असल्याचा दावाही त्यांनी केला. ते म्हणाले की, "९० टक्के महिलांची राजकीय कारकीर्द नेत्यांच्या 'खोल्यांमधून' सुरू होते."

खासदार पप्‍पू यादव
महिला आरक्षणाचे मारेकरी

दररोज एखाद्या नेत्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर येत असते...

"कौटुंबिक हिंसाचार कोण करत आहे? महिलांवर कोणाची नजर आहे? अमेरिकेपासून भारतापर्यंत, हे काम राजकारणी लोकच करत आहेत. राजकारण्यांच्या खोलीशिवाय ९०% महिला राजकारणात येऊ शकत नाहीत. दररोज एखाद्या नेत्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर येत असते. भारतात महिलांचे शोषण करणे हे जणू धोरणच बनले आहे," असे दावाही पप्पू यादव यांनी केला.

खासदार पप्‍पू यादव
Nari Shakti Vandan Vidhayak: 'अंतरात्म्याचा आवाज ऐका, नारीशक्तीचा सन्मान करा'; महिला आरक्षण विधेयकावर PM मोदींचे खासदारांना आवाहन

भाजपकडून तीव्र निषेध

पप्पू यादव यांच्या अत्यंत खालच्या पातळीवरील विधानावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी 'X' वर पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "धक्कादायक विधान! देश 'नारी शक्ती'ला प्रोत्साहन देत असताना, काँग्रेसचे समर्थन लाभलेले खासदार काय म्हणत आहेत ते पहा! खासदार पप्पू यादव यांचे महिलांविषयीचे वादग्रस्त विधान समोर आले आहे. नेत्यांच्या खोलीत गेल्याशिवाय ९०% महिला राजकारणात येऊ शकत नाहीत, असे ते म्हणाले. ही त्यांची मानसिकता दर्शवते."

खासदार पप्‍पू यादव
Priyanka Gandhi Vadra : जुनं विधेयक परत आणा, पाहुयात कोण महिला विरोधी आहे.... प्रियांका गांधी वाड्रांनी चांगलेच सुनावले

महिला आरक्षणावर चर्चा सुरू असतानाच वादग्रस्त विधान

महिला आरक्षण लागू करण्यासाठी आणि लोकसभेच्या जागांची संख्या ८१६ पर्यंत वाढवण्यासाठी आणलेले सरकारचे 'संविधान (१३१ वी सुधारणा) विधेयक' कनिष्ठ सभागृहात मंजूर होऊ शकले नाही. लोकसभेत विधेयक फेटाळल्यानंतर विरोधकांनी केलेल्या जल्लोषावर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "संसदेत जे काही घडले ते केवळ बाके वाजवणे नव्हते, तर महिलांच्या सन्मानावर आणि स्वाभिमानावर झालेला तो हल्ला होता. स्त्री अनेक गोष्टी विसरू शकते, पण ती तिचा अपमान कधीही विसरत नाही." एकीकडे देशभरात महिला आरक्षणावर चर्चा सुरू असतानाच खासदार पप्‍पू यादव यांनी अत्‍यंत खालच्‍या पातळीवरचे विधान केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news