Nanded News : खालसा फायनान्सला कुलूप ठोकले, खुनाचा गुन्हा दाखल

नांदेडमधील शेतकरी मृत्यू प्रकरण; तीनजण अटकेत
Nanded News
Nanded News : खालसा फायनान्सला कुलूप ठोकले, खुनाचा गुन्हा दाखलfile photo
Published on: 
Updated on: 

Khalsa Finance locked down; murder case registered

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : दहा हजाराच्या कर्जवसुलीसाठी माळकोठा (ता. मुदखेड) येथील शेतकऱ्याचे अपहरण करून दोन दिवस बेदम मारहाण आणि संशयास्पद मृत्यूप्रकरणी नांदेडमधील खालसा फायनान्स कंपनीतील कर्मचाऱ्यांवर पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला असून, तीन जणांना अटक केली आहे. याशिवाय मुख्य सूत्रधार व फरार कर्मचाऱ्यांना शोधण्यासाठी पोलिसांनी अकरा पथके कार्यरत केली असून, कंपनीच्या कार्यालयाला कुलूप ठोकले आहे. दरम्यान, याच गावातील युवकाचेही अपहरण करून त्यास मारहाणीचा प्रकार उजेडात आला आहे.

Nanded News
Nanded News : गडग्यात पिसाळलेल्या तीन वानरांचा धुमाकूळ!

खालसा फायनान्स कंपनीचा कार्यालयात चंद्रकांत शिंदे या शेतकऱ्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत शनिवारी आढळल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली. फायनान्स कंपनीत शेतकऱ्याचा झालेला मृत्यू हा खुनच असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करीत अपहरण, खुनाचा गुन्हा नोंदविला आहे.

स्थानिक गुन्हे शाखा व वजीराबाद पोलिसांनी संयुक्त कारवाई करून याप्रकरणी आरोपी जयकुमार ऊर्फ शेरा भगवान गायकवाड (रा. गोपाल चावडी, सिडको), शेख आमेर शेख साहेबहूसेन (रा. मलंग बाबा बिल्डिंगजवळ, खुदबेनगर चौक, देगलूर नाका), इम्रान खान शाहबाज खान (बु-हाण मस्जिदजवळ, गोवर्धन घाट) या तिघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरुद्ध अटकेची पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू असल्याचे पोलीस माळकोठा येथील ४० वर्षीय शेतकरी चंद्रकांत दगडूजी शिंदे यांची २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास मारोती मंदिराजवळून दोन अनोळखी व्यक्तींनी जबरदस्तीने दुचाकीवर बसवून नांदेडमधील केएफ एंटरप्रायझेस अर्थात खालसा फायनान्सच्या कार्यालयात आणले.

तिथे त्यांना दोन दिवस डांबून ठेवून पट्ट्या व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली, या कार्यालयात त्यांचा गळफास असलेल्या अवस्थेत जागीच मृत्यू झाला. मृत शेतकऱ्याच्या पत्नी ज्योती शिंदे यांच्या संहितेच्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी शोकाकूल वातावरणात शिंदे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. चंद्रकांत यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. विरोधकांनी या प्रकरणी सरकारला धारेवर धरले आहे. राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी फायनान्स कंपन्यांवर कडक कारवाईचा इशारा दिला आहे.

Nanded News
Nanded News : शॉर्टसर्किटमुळे २५ एकरांतील ऊस जळून खाक; उमरखेडजवळील नागेशवाडी शेतशिवारातील घटना

आणखी एका युवकाचे अपहरण; खोलीत डांबून मारहाण

कर्जाची परतफेड करण्यासाठी तगादा लावत कर्जदाराला धमकावणे, बळजबरीने दुचाकीवर बसवून नेणे, लाकडी काठीने मारहाण करणे आणि खोलीत डांबून ठेवल्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथील दत्ता किशन गायकवाड (वय ३७) यांच्या तक्रारीवरून नांदेड येथील 'खालसा फायनान्स'च्या मालकासह चार जणांवर मुदखेड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी गायकवाड यांच्याकडे तब्बल ४० शिवीगाळ केली. थापड-बुक्क्यांनी व लाकडी काठीने पायावर मारहाण करून जखमी केले

११ विशेष पथके तैनात

या प्रकरणातील इतर व्यक्तींचा विशेष पथकांमार्फत शोध घेतला जात आहे. खुनाचा गुन्हा दाखल होताच फायनान्सच्या कार्यालयास पोलिसांनी कुलूप ठोकले आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत हे कुलूप कायम राहणार आहे. फरार आरोर्पीच्या मुसक्या आवळण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची सहा आणि वजिराबाद पोलिसांची पाच अशी एकूण ११ विशेष पथके खाना करण्यात आली आहेत. पोलिसांनी कार्यालयाला कुलूप ठोकल्यानंतर कागदपत्रे जप्त केली आहेत. या जप्त ऐवजातून अनेक अवैध व्यवहारांची पोलखोल होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना छळणाऱ्या फायनान्सच्या कर्मचाऱ्यांवर मोका लावण्याची तयारी पोलिस करीत असल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news