Nanded News | शिवणी येथे बनावट खत विक्रीचा पर्दाफाश

Kinwat Agriculture Department Raid | किनवट कृषी विभागाची कारवाई ; 14 लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त
Fake Fertilizer Scam
किनवट कृषी विभागाची कारवाई(Pudhari Photo)
Published on
Updated on

Fake Fertilizer Scam

किनवट : शिवणी (ता. किनवट) येथे बनावट व परवाना नसलेले सेंद्रिय खत वाहनातून विक्रीस ठेवण्यात आले असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून, कृषी विभागाने तत्परतेने पोलिसांच्या मदतीने केलेल्या कारवाईत सुमारे 14 लाख 64 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी खत नियंत्रण आदेश 1985 आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरूवारी (दि.22) दुपारी करण्यात आली.

शिवराम मुंडे (गुणवत्ता निरीक्षक तथा कृषी अधिकारी, पंचायत समिती, किनवट) यांनी ईस्लापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, किनवट तालुक्यातील तेलंगणा सिमेनजीकच्या शिवणी गावातील श्रीकृष्ण मंदिराजवळील मलकजाम रोडवर एका चारचाकी वाहनातून अनधिकृत खत विक्री होत असल्याची गोपनीय माहिती गुरूवारी मिळाल्यानंतर त्यांनी किनवट तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे व इस्लापूचे कृषी पर्यवेक्षक शिवाजी जाधव यांच्यासह त्या ठिकाणी तातडीने जाऊन कारवाई केली.

Fake Fertilizer Scam
Nanded Crime: किनवट येथे दोन सलून कारागिरांवर प्राणघातक हल्ला

सदर आयशर कंपनीच्या चारचाकी वाहनात (क्रमांक टीएस 07 युई 6422) श्री विजया बायो फर्टिलायझर या हैदराबादस्थित कंपनीचे मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय खत साठवलेले आढळले. त्यामध्ये हायग्रो ऑर्गेनिक खताच्या प्रत्येकी 40 किलो वजनाचे 24 पोते (गोणी), विराटी सॉईल कंडिशनरच्या 50 किलो वजनाचे 45 पोते (गोणी), एस.व्ही. लिक्विड सीवीड अर्कच्या एक लिटरच्या 9 बाटल्या (ज्यांच्यावर 'मोफत' असा उल्लेख होता), आणि एस.झाइम ग्रॅन्युल्सचे 8 किलो वजनाचे 3 पोते आढळून आले. या सर्व खतांचे एकत्रित मूल्य सुमारे 64 हजार 452 रुपये इतके आहे.

Fake Fertilizer Scam
Nanded News : धामनदरीत भरदिवसा घर फोडून सव्वा सहा लाखाची चोरी

घटनास्थळी उपस्थित असलेले बासू किरण रेड्डी (रा. कोत्तापल्ली, रंगारेड्डी,तेलंगणा) हे विक्रेते कोणतेही खत विक्री परवाना, पावती, उगम प्रमाणपत्र किंवा कंपनी प्रतिनिधीचे अधिकृत पत्र न दाखवता विक्री करत होते. ग्राहकांना विक्री बिलही न देता त्यांनी खत विक्री केली होती, जे खत नियंत्रण आदेश 1985च्या तरतुदींनुसार बेकायदेशीर आहे.

Fake Fertilizer Scam
Nanded News : नागरिकांच्या कामात अधिकाऱ्यांची दिरंगाई सहन करणार नाही : आमदार चिखलीकर

या प्रकरणी पंचासमक्ष पंचनामा करण्यात आला असून संपूर्ण खताचा नमुना घेऊन विश्लेषणासाठी छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. वापरात असलेले चारचाकी वाहन (किंमत अंदाजे 14 लाख रुपये) आणि खत जप्त करण्यात आले आहे. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत 14 लाख 64 हजार 452 रुपये इतकी आहे.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध खत नियंत्रण आदेश 1985 मधील कलम 4, 5, 7, 8, 19(सी)(III), तर अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत कलम 3(2)(ए)(डी), कलम 7 आणि भारतीय न्यायसंहिता 2023 च्या कलम 318 व 3(5) अन्वये इस्लापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक उमेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news