

Will not tolerate delay by officials in citizens' work : MLA Chikhlikar
माळाकोळी : पुढारी वृत्तसेवा
दक्षिण भारतात प्रसिद्ध खंडोबा देवस्थान माळेगांव यात्रा येथे दिनांक 29 मंगळवार रोजी शासन आपल्या दारी कार्यक्रमा अंतर्गत आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबार आयोजित केला होता. यात आ. चिखलीकर यांनी अधिकाऱ्यांना नागरिकांच्या कामात दिरंगाई झाल्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करीन असा इशारा या बैठकीत दिला.
मी सातत्याने अधिकारी व कर्मचारी यांची बाजू घेतो व कोणाचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतो, पण सर्व सामान्य जनतेला न्याय मिळाला पाहिजे. त्यांचा वेळ व पैसा वाया जाता कामा नये. जनतेची कामे वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. मागिल काळात काय झाले याच्याशी काही देणे घेणे नाही. पण माझ्या पाच वर्षांच्या काळात जनतेच्या मुलभूत सुविधांसाठी जनतेची दिशाभूल किंवा हेळसांड होता कामा नये. कामात कुचराई किंवा दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही आसे खडे बोल त्यांनी सुनावले.
या प्रसंगी हाणमंत धुळगंडे यांचे प्रास्ताविक झाल्यानंतर आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी माळाकोळी सर्कल व सावरगाव सर्कल मधील लोकांना गाव वाईज जवळ बोलवून समस्या ऐकून घेतल्या व प्रतेकाचे प्रश्न कोणत्या खात्याशी संबंधित आहेत. त्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून व आमदारांच्या माध्यमातून सोडवण्यासाठी सूचना व आदेशीत करण्यात आले.
तालुक्यातील तहसीलदार, गटविकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, प्रकल्प अधिकारी, डॉ श्रद्धा बोथीकर, पाणी पुरवठा, विज वितरण, आरोग्य, पशू, शेती, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद बांधकाम व ईतर सर्व विभागाचे प्रमुखांच्या उपस्थित सावरगाव सर्कल व माळिकोळी सर्कलमधील प्रमुख सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी, विधवा, परित्यक्ता कामासाठी तहसील कार्यालय, पंचायत समितीच्या चक्रा मारून थकलेले नागरीक उपस्थित होते.
या वेळी महिला बालविकासकडून व आरोग्य विभागाच्यावतीने स्टॉ व आहार प्रदर्शन ठेवून उपस्थिती लोकांना माहिती देण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी आ. प्रतापराव पाटील चिखलीकर, तहसिलदार परळीकर, प्रविण पाटील चिखलीकर, गटविकास अधिकारी वा घो आडेराव, गटशिक्षणाधिकारी व्यव्हारे, नायब तहसीलदार मोकले, कृषी अधिकारी पोटपेलवार, प्रकल्प अधिकारी पवार मॅडम, घरकुल विभागाचे तेलंग, आनंदराव पाटील शिंदे, हंसराज पाटील बोरगांवकर, दत्ता वाले, माणिकराव मुकदम, देविदास महाराज गिते, मारोती पाटील बोरगांवकर, बालाजी पाटील कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक बेरदे, खुशाल पाटील पांगरीकर, नरेंद्र गायकवाड, बि डी जाधव, परमेश्वर मुरकुटे, संजय मामा चाटे, डॉ नागरगोजे, बाळू बाबर, रामदास हाके, डॉ कांबळे, अंगणवाडी सुपरवायझर घोडजकर मॅडम, सविता वाघमारे, परिसरातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, ग्रामविकास अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, हजारोंच्या संखेने नागरिक उपस्थित होते.