खा.अशोक चव्हाणांनी सुरू केली सेवा सोसायट्यांच्या ठरावांची गोळाबेरीज

Nanded news | प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले पुढील दिशानिर्देश
खा.अशोक चव्हाणांनी सुरू केली सेवा सोसायट्यांच्या ठरावांची गोळाबेरीज
Ashok Chavan
Published on
Updated on

नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर होणे बाकी असले तरी निवडणूकपूर्व तयारीसाठी ठरावांची गोळाबेरीज करण्यात भाजपने अत्यंत सूक्ष्म नियोजन केल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात झालेल्या एकूण ठरावांचा आढावा आणि पुढील रणनिती ठरविण्यासाठी माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण यांनी सर्व विधानसभा मतदारसंघातील निवडक प्रमुखांची बैठक घेऊन दिशानिर्देश देण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे.

खा.अशोक चव्हाणांनी सुरू केली सेवा सोसायट्यांच्या ठरावांची गोळाबेरीज
Ashok Chavan : जिल्हा बँकेच्या शासकीय कर्जाचे मीच अनुदानात रूपांतर केले!

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ संपल्यानंतर या बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणुकीसाठी १५ एप्रिलपर्यंत सर्व ठराव घेण्याची मुदत होती. या मुदतीत अ, ब आणि क स्तरावरील ठराव घेण्याची प्रक्रिया पुर्ण करून जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांकडे संबंधित संस्थांनी पाठविले आहेत. या ठरावांमध्ये अ श्रेणीतील ९३० ठराव प्राप्त झाले असून ब श्रेणीतील १८१ आणि क श्रेणीतील २५८ ठराव असे एकूण १३६९ ठराव निवडणूक अधिकाऱ्यांकडे प्राप्त झाल्याची माहिती आहे. माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी आयटीएममध्ये काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन नायगाव, लोहा-कंधार, हदगाव-हिमायतनगर आणि नांदेड विधानसभा क्षेत्रातील प्राप्त ठरावांचा आढावा घेतला.

खा.अशोक चव्हाणांनी सुरू केली सेवा सोसायट्यांच्या ठरावांची गोळाबेरीज
Babasaheb Patil : सहकार क्षेत्रामुळे राज्याची वेगळी ओळख

एकूण १३६९ ठरावांपैकी भाजपच्या बाजूचे जास्तीत जास्त ठराव किती? याचीही गोळाबेरीज करण्याच्या सूचना खा.चव्हाण यांनी दिल्याचे सांगण्यात आले. उर्वरित मुखेड, भोकर, बिलोली-देगलूर आणि किनवट-माहूर विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची लवकरच बैठक घेण्यात येणार असून तालुकास्तरावरील १६ आणि जिल्हास्तरीय ७ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी नांदेड महानगर पालिका निवडणुकीप्रमाणेच नियोजन केल्याचे दिसून येत आहे.

खा.अशोक चव्हाणांनी सुरू केली सेवा सोसायट्यांच्या ठरावांची गोळाबेरीज
NDCC Bank election : खा.अशोक चव्हाण म्हणतील तोच राहील बँकेचा उमेदवार

खा.चव्हाण यांनी खा.अशोक चव्हाण यांनी जिल्हा बँक निवडणुकीसाठी राबविलेली यंत्रणा लक्षात घेता ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची होणार आहे. बँकेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी खा. चव्हाण यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. नूतन संचालक मंडळाच्या कार्यकालात बँकेत होणारी साडेपाचशे पदांसाठी नोकर भरती, खा. चव्हाण यांची संभाव्य एन्ट्री, बँकेला होणारा नफा आणि खातेदारांची वाढती विश्वासार्हता लक्षात घेता बँकेत शिरकाव करण्यासाठी अनेकांची धडपड सुरू आहे.

खा.अशोक चव्हाणांनी सुरू केली सेवा सोसायट्यांच्या ठरावांची गोळाबेरीज
NDCC bank election : कार्यकर्त्यांना वनवास; नांदेड जिल्हा बँकेत येणार ‌‘वारसराज!‌’

९३० ठराव हे सेवा सहकारी सोसायटीचे ठराव असून ते अ वर्गवारीतील आहेत.१८१ ठराव हे गृहनिर्माण संस्था, जिनिंग, प्रेसिंग, शिक्षक पतपेढी अशा सहकारी संस्थांचे असून हे ठराव ब वर्गवारीतील आहेत.तर क वर्गवारीतील २५८ ठराव हे मजूर सहकारी संस्था व तत्सम संस्थांनी पाठवलेले ठराव आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news