NDCC Bank election : खा.अशोक चव्हाण म्हणतील तोच राहील बँकेचा उमेदवार

ठक्करवाड यांनी ओलांडली हंबर्डे गटाची ‌‘लक्ष्मण रेषा‌’
NDCC Bank election
खा.अशोक चव्हाण म्हणतील तोच राहील बँकेचा उमेदवारpudhari photo
Published on
Updated on

नांदेड ः नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी संस्थेमार्फत ठराव पाठविण्याची धामधूम सुरू असतानाच बँकेचे माजी संचालक लक्ष्मण ठाकरवाड यांनी जिल्हाध्यक्ष संतुक हंबर्डे गटाचा ट्रॅक सोडून खासदार अशोक चव्हाण गटाच्या एक्सप्रेसमध्ये घुसण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे समोर आले आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची मुदत 2 एप्रिल रोजी संपली आहे. निवडणूक कार्यक्रमही जाहीर झाला आहे. त्यानुसार 15 एप्रिलपर्यंत संस्थेमार्फत एकाच्या नावाचा ठराव पाठवावयाचा आहे. बिलोली तालुक्यात 54 सोसायट्या, 10 गृहनिर्माण संस्था, 4 मजूर संस्था व 1 मच्छीमार संस्था अशा 59 संस्था मतदानास पात्र आहेत.

NDCC Bank election
Pune Cooperative Bank: पुणे सहकारी बँकमध्ये १० वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ पूर्ण करणारे संचालक निवडणुकीस अपात्र

कासराळी येथील ठक्करवाड यांच्या अमृतधाम गोशाळा येथे सोमवारी नांदेड जिल्हा सहकारी बँक निवडणूक नियोजन संदर्भात महत्वपूर्ण बैठक पार पडली. भाऊराव चव्हाण साखर कारखान्याचे चेअरमन नरेंद्र चव्हाण , आमदार जितेश अंतापुरकर,गोविंद पाटील नागेलीकर यांच्या उपस्थितीत ठरावा संदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाली. निवडणुकीबाबत नरेंद्र चव्हाण यांनी केलेल्या सूचना मान्य करत ठक्करवाड यांनी खासदार अशोक चव्हाण सांगतील त्याच उमेदवाराला आमचे समर्थन राहील असे जाहीर केले.

ठक्करवाड हे जिल्हाध्यक्ष संतुक हंबर्डे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. जिल्हा कार्यकारिणीवर सरचिटणीस हे महत्त्वाचे पदही त्यांच्याकडे आहे. या आधीही राम पाटील, व्यंकटराव पाटील गोजेगावकर जिल्हाध्यक्ष असतानाही ठक्करवाड सरचिटणीस पदावरच कार्यरत होते. आता जिल्हा बँकेच्या संचालक पदाची डोहाळे लागल्याने जिल्हाध्यक्ष हंबर्डे यांनाही “कट मारण्याची त्यांची तयारी सुरू आहे का? अशी जोरदार चर्चा रंगली आहे.

या बैठकीला माधवराव मिसाळे, भाजपा जिल्हा सरचिटणीस उमाकांत गोपछडे, हावगीराव गोपछडे, अरविंद ठक्करवाड ,संदीप पाटील रामपुरे मारोती राहीरे, शिवराज बोधने,साईराज रुद्रुरकर यांची उपस्थिती होती.

NDCC Bank election
Sangli News : जिल्हा बँकेच्या शताब्दी वर्षात विविध उपक्रम

गेल्या निवडणुकीत ठक्करवाड यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यावेळी त्यांनी बिलोली तालुक्यातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून ते संस्थाप्रमुखांच्या गाठीभेटी करीत आहेत.

  • मागील निवडणुकीत ठक्करवाड यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यावेळी खा.अशोक चव्हाण यांच्या पाठबळावर बँकेत शिरकाव करता येईल, अशी आशा बाळगून असल्याने ते यापुढे चव्हाण गटाच्या तालावर चालतील असे दिसते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news