वाशिम : चार दुचाकी वाहनांसह दोन अट्टल चोरट्यांना अटक

वाशिम : चार दुचाकी वाहनांसह दोन अट्टल चोरट्यांना अटक

वाशिम, पुढारी वृत्तसेवा : शहरातून चोरीस गेलेल्या चार दुचाकींसह दोन अट्टल चोरट्यांना शुक्रवारी (दि.31) वाशिम शहर पोलिसांनी अटक केली. शिवा जाधव आणि सोनू जाधव अशी या दोघांची नावे आहेत.

शहर पोलीस चोरीला गेलेल्या गाड्यांचा तपास करत होते. दरम्यान तपास करताना एका ठिकाणावरील सीसीटिव्ही फुटेजमध्ये वाशीम येथील शिवा जाधव हा संशयितरित्या हालचाल करताना दिसून आला. यानंतर त्याला चौकशीसाठी पोलिसांनी बोलवून घेतले. गाडी चोरी बाबत त्याची कसून चौकशी केली. यावेळी त्याने वाशीम शहर परिसरातील 03 तर शिरपूरमधील 01 गाडी चोरी केल्याची कबुली दिली. या चोरीमध्ये नमूद शिवा जाधवन याने त्याचा चुलत भाऊ सोनू जाधव (रा.देवठाण, वाशीम) याच्या मदतीने दुचाकी चोरल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेत कारवाई केली. तसेच या दोघांकडून 04 गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. या चोरीच्या घटनेबद्दलची शिरपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवेंद्रसिंग ठाकूर यांच्या सूचनांप्रमाणे वाशीम शहर पथक अधिकारी पोउपनी, निलेश जाधव, पो.ह ठाकूर, पो शी देशमुख, पो शी दुतोंडे, पो शी कोरडे, पो. शी.बोडखे, पो. शी. इरतकर यांनी केली.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news