ब्रेकिंग | प्रज्वल रेवण्णाला ६ दिवसांची पोलीस कोठडी

Prajwal Revanna
Prajwal Revanna
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अत्याचार आणि लैंगिक छळ प्रकरणात हासन मतदारसंघाचा खासदार आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णा याला अटक करण्यात आली. गुरूवारी मध्यरात्री विशेष तपास पथकाने (एसआयटी) त्याला जर्मनीतील म्युनिक येथून बेंगळुरू विमानतळावर पोहोचताच अटक केली. अटकेनंतर त्याला आज न्यायालयासमोर हजर केले असता ६ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

प्रज्वल रेवण्णा याच्यावर २७ एप्रिल रोजी लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर तो परदेशात पळून गेला होता. अखेर आज त्याला अटक करण्यात आली. विशेष तपास पथकाने (एसआयटी) सकाळी बेंगळुरू येथील सीआयडी कार्यालयात त्याची प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर बोअरिंग आणि लेडी कर्झन हॉस्पिटलमध्ये त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

एचडी रेवन्ना यांच्या याचिकेची सुनावणी पुढे ढकलली

कर्नाटक उच्च न्यायालयाने प्रज्वल रेवन्ना यांचे वडील आणि जेडी(एस) नेते एचडी रेवन्ना यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी ३ जूनपर्यंत पुढे ढकलली आहे. लैंगिक अपहरण केल्याप्रकरणी केआर नगारा पोलीस ठाण्यात दाखल एफआयआर रद्द करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. एसआयटीने प्रज्वलची आई भवानी रेवन्ना यांनाही चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. एसआयटीने त्यांना १ जून रोजी होलेनरसीपूर येथील घरी हजर राहण्यास सांगितले आहे. भवानी या प्रकरणात आरोपी नसल्या तरी, एसआयटीला त्यांच्या भूमिकेची चौकशी करायची आहे. याच प्रकरणात प्रज्ज्वलचे वडील आमदार एचडी रेवन्ना यांना अटक करण्यात आली होती. नंतर त्यांची जामिनावर सुटका झाली.

बंगळुरू विमानतळावर पोहचताच प्रज्वलला अटक

प्रज्वल याने गुरूवारी जर्मनीतून म्युनिक विमातळावरुन लुफ्थांसा एअरलाइनचे बिझनेस क्लासचे तिकीट बुक केले होते. तिकीट बुक करताना त्याने त्याचा संपर्क क्रमांक आणि ईमेल आयडी शेअर केला नव्हता. तो विमानात चढत असताना त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एसआयटीने आधीच एअरलाइन आणि अधिकाऱ्यांशी समन्वय साधला होता. एसआयटी बंगळुरू विमानतळावर त्याला अटक करण्यासाठी आधीच सज्ज होती. जर्मनीतून भारतीय प्रमाणवेळेनुसार गुरुवारी दुपारी ३.३५ वाजता विमान निघाले होते. गुरूवारी मध्यरात्री १२.४९ वाजता विमान केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचले. विमानतळावर पोहचताच पोलिसांनी त्याला अटक केली.

चारशे महिला प्रज्वलच्या वासनेच्या शिकार

प्रज्वल रेवण्णा याने आपल्या निरंकुश सत्तेचा वापर करून सुमारे ४०० महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे उघडकीस आले आहे. त्यात कर्नाटक प्रशासनातील महिला अधिकारी, नेत्यांच्या पत्नी आणि त्याच्याच पक्षातील महिला कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. सुरुवातीपासूनच स्त्रीलंपट अशी प्रतिमा असलेल्या प्रज्वलने ४०० महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. पैकी ९० महिला या अधिकारी, नेत्यांच्या बायका किंवा निधर्मी जनता दलाच्या कार्यकर्त्या आहेत. प्रज्वलने महिलांचे लैंगिक शोषण करत असताना स्वतःच त्या कृत्यांचे मोबाईलवर व्हिडीओ चित्रणही केले आहे. त्यावर कळस म्हणजे त्या व्हिडीओ चित्रणाची भीती दाखवून त्याने त्या महिलांना वारंवार आपल्या वासनेची शिकार बनवले आहे, असे तपासातून पुढे येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news