अल्पवयीन मुलीला पळवून ‘तो’ जात होता उत्तरप्रदेशात , पोलिसांनी केले गजाआड

अल्पवयीन मुलीला पळवून ‘तो’ जात होता उत्तरप्रदेशात , पोलिसांनी केले गजाआड

गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा : धानोरा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपासचक्रे वेगाने फिरवून अवघ्या चोवीस तासांत आरोपीला अटक केली आहे.

अनुज पाल (वय ३७ रा. मेरठ, उत्तरप्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. सोमवारी (दि.२७) एका अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने पळवून नेल्याची घटना घडल्यानंतर धानोरा तालुक्यात खळबळ माजली. दुसऱ्या दिवशी मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक स्वरुपा नाईकवाडे यांनी मुलीच्या आई-वडिलांकडे चौकशी करुन आरोपीचा मोबाईल नंबर शोधला.

त्याच्या शेवटच्या लोकेशनवरुन आरोपी हा नागपूरवरुन छत्तीसगड एक्सप्रेसने मेरठच्या दिशेने प्रवास करत होता. त्यानंतर पोलिसांचे पथक मेरठला गेले. त्यांनी मेरठ येथील रेल्वे स्थानकावरुन आरोपी अनुज पाल आणि अल्वयीन मुलीला ताब्यात घेतले. पोलिसांनी मुलीला तिच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करुन आरोपीला पोक्सो कायद्या अंतर्गत अटक करण्यात आली. पोलीस अधीक्षक नीलोत्पल, उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास शिंदे, पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news