Sangli News : भाटशिरगाव येथील मारहाणीतील गंभीर जखमीचा मृत्यू

अमृत दत्तात्रय देसाई
अमृत दत्तात्रय देसाई

शिराळा; पुढारी वृत्तसेवा : चिखली (ता.शिराळा) येथे पैशाच्या देवाण घेवाणीच्या जुन्या वादातून झालेल्या मारहाणीत जखमी अमृत दत्तात्रय देसाई (रा. भाटशिरगाव) यांचा उपचारादरम्यान कराड येथील रुग्णालयात बुधवारी ( दि.२९) दुपारी दीड वाजता मृत्यू झाला. ही घटना दि. ६ एप्रिल रोजी रात्री साडे दहाच्या दरम्यान घडली होती. याबाबत संशयित आरोपी सुहास नामदेव गायकवाड ( रा.चिखली) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक केली आहे. (Sangli News)

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी सुनिल बाबासाहेब देसाई व त्याचा चुलत भाऊ अमृत दत्तात्रय देसाई हे संशयित आरोपी सुहास नामदेव गायकवाड यांचे घरी जेवण करण्यासाठी गेले होते. त्यांच्यामध्ये पैशाच्या कारणावरुन वाद झाला. यावेळी संशयित आरोपी सुहास गायकवाड याने तेथील ठेवलेल्या खो-याने सुनील देसाई यांच्या डोक्यात व अमृत देसाई यास डावे कानावर मारुन मारहाण करुन गंभीर जखमी केले होते. Sangli News

याबाबत दि. ६ एप्रिल रोजी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. दि.७ रोजी सुहास गायकवाड यास अटक केली होती. त्यास न्यायालयात हजर केले असता दि. ८ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयातून जामीनावर मुक्तता करण्यात आली होती.

अमृत देसाई हे मारहाणीमुळे गंभीर जखमी झाले होते. त्यांचेवर बेशुध्द अवस्थेत दि.६ एप्रिल रोजी इस्लामपूर येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने दि.२० पासुन कराड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरू असताना दि.२९ मे रोजी दुपारी दीड वाजता त्यांचा मृत्यू झाला. याबाबत संशयित आरोपी सुहास गायकवाड याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपास हवालदार बी. एस. भोसले यांनी केला होता. पुढील तपास पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम करीत आहेत.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news