Maratha Reservation Protest | नांदेड : नायगावमध्ये मराठा आंदोलन पेटले; गटविकास अधिकाऱ्यांची गाडी जाळली | पुढारी

Maratha Reservation Protest | नांदेड : नायगावमध्ये मराठा आंदोलन पेटले; गटविकास अधिकाऱ्यांची गाडी जाळली

नायगाव; पुढारी वृत्तसेवा : नांदेड जिल्ह्यातील नायगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचे शासकीय गाडी (जीप क्र. एम एच २५/६१०१) आज पहाटे अज्ञातांकडून जाळण्यात आल्याची माहिती मिळत आहे. याबाबत गटविकास अधिकारी वाझें यांना संपर्क केला असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला असून पोलीस तक्रार करणार असल्याचे सांगितले. (Maratha Reservation Protest)

नायगाव पंचायत समिती कार्यालय नांदेड-हैद्राबाद महामार्गावर असलेल्या शहरापासून दोन किमी अंतरावर असलेल्या प्रशासकीय इमारतीत आहे. नेहमीप्रमाणे जीप गटविकास अधिकारी यांच्या कार्यलयासमोर लावून चालक व गटविकास अधिकारी आपल्या घरी गेले. रात्री हेडगेवार चौक येथे टायर पेटवून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले होते. पहाटेपर्यंत आंदोलन सुरू होते. नायगाव तालुक्यात हे आंदोलन चांगलेकच पेटले असून प्रशासनाची जीप जाळल्याने सर्वत्र या आंदोलनाची धग पेटताना दिसत आहे. आज सकाळपासूनच पळ सगसाव, टाकळगाव, खंडगाव, कहाळा महामार्गावर टायर जाळून आंदोलन तीव्र करण्यात आले. आज नायगाव तालुक्यात सर्वत कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

हेही वाचा : 

Back to top button