सोलापूर : आमदार सुभाष देशमुख यांच्या निवासस्‍थानी ठिय्या आंदोलन | पुढारी

सोलापूर : आमदार सुभाष देशमुख यांच्या निवासस्‍थानी ठिय्या आंदोलन

सोलापूर ; पुढारी वृत्‍तसेवा सकल मराठा समाजाच्यावतीने सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांच्या निवासस्‍थानासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करत आमदार सुभाष देशमुख यांच्या राजीनाम्‍याची मागणी केली. यावेळी आंदोलकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

सहा दिवसांपासून मनोज जरांगे-पाटील हे आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांची तब्येत खालावत चालली आहे. तरीसुद्धा सरकारला जाग आली नाही. लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प आहेत. या विषयी मराठा आंदोलकांनी रोष व्यक्‍त केला, तसेच आमदार सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी आंदोलन केले.

मराठा तरुणांनी यावेळी सुभाष देशमुख यांना प्रश्न विचारला की, 50% मधून ओबीसीच्या कोट्यातून आरक्षणाबाबत तुमची भूमिका काय आहे? याचे उत्तर द्यावे अशी मागणी केली. यावेळी सुभाष देशमुख यांनी अपेक्षित उत्तर दिले नाही. त्यामुळे आमदार सुभाष देशमुख यांच्या निषेध करून मराठा आंदोलकांनी सुभाष देशमुख यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी मराठा समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button