गँगवार प्रकरणातील ६ आरोपींना अटक

पोलिसांकडून धरपकड : आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी
nanded crime news
गँगवार प्रकरणातील ६ आरोपींना अटकfile photo
Published on
Updated on

6 Accused Arrested in Gang War Case

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : शुक्रवारी मध्यरात्री ई-स्क्वेअर भागात वर्चस्ववादातून दोन गँगमध्ये झालेल्या गंगवॉरमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या गैंगवॉरमध्ये सदा गंगचा एक सदस्य, तर साईलाला गंगचे दोन असे एकूण तीन गुंड ठार झाले. घडलेल्या या भयानक घटनेने हादरून गेलेल्या भाग्यनगर पोलिसांनी आरोपींची धरपकड करत दोन्ही गंगमधील ६ आरोपींना अटक केली आहे. या सर्व आरोपींना रविवारी (दि.५) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ६ जणांना ८ एप्रिलपर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

nanded crime news
Crime News : दुकाने फोडणारा आरोपी जेरबंद

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, गुन्हेगारी वर्चस्व वादातून दोन गंगमध्ये काही दिवसांपासून धुसफूस सुरू होती. शुक्रवारी मध्यरात्री सदा गँगचा सदस्य असलेला अरिजितसिंग चव्हाण हा मित्रांसोबत चित्रपट बघून घराकडे परत येत असताना पाळत ठेवून असेल्या साईलाला गँगच्या सदस्यांनी अजितसिंग (२७) व त्याच्या साथीदारांवर चाकू, तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात अरिजितसिंगचा जागेवरच मृत्यू झाला. तर साईलाला गंगचा सय्यद मोहम्मद अरबाज मोहम्मद फारुख (२३) उपचारापूर्वी मृत्यू झाला. तर शासकीय रुग्णालयातील अपघात विभागात उपचार घेत असलेल्या आवेज सय्यद खलील (२७) याच्यावर अरिजितसिंगच्या भावाने चाकूने सपासप वार करून त्याचा खून केला.

या प्रकरणात दोन्हीकडून परस्पर विरोधी जवळपास २० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना सूचना देऊन तातडीने आरोपीला अटक करण्याचे निर्देश दिले.

nanded crime news
Jalna News : जबरी चोरीतील अट्टल आरोपी जेरबंद

पोलिसांनी आरोपींची धरपकड करत साईलाला या गँगमधील १. शहारुख खान व २. सोनू राऊत (दोघे रा. इतवारा, नांदेड) या दोघांना अटक केली आहे. तर सदा गँगमधील अरिजितसिंगचा भाऊ १. प्रदीप ऊर्फ राजेश गजानन चव्हाण (२४), २. गजानन चव्हाण (दोघे रा. बालाजीनगर, नंदीग्राम सोसायटी), ३. नागेश ऊर्फ वड्या उत्तमराव लड्डे (२५, रा.श्रीनगर, नांदेड), ४. संभाजी अनंतराव क्षीरसागर ( २५, रा.डी मार्टजवळ, नांदेड) अशा चार जणांना अटक केली आहे. या प्रकरणात साईलाला गंगचा लिडर साईसिंग गहेरवाल याच्यासह इतर आरोपी फरार आहेत.

अटक केलेल्या या ६ आरोपींना पोलिसांनी रविवारी नांदेड जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्व आरोपींना ८ एप्रिलपर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान या प्रकरणातील इतर फरार आरोपींचा पोलिस शोध घेत असून, लवकरच इतर आरोपींना अटक करण्यात येईल, अशी माहिती भाग्यनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष तांबे यांनी दिली आहे.

तिघांवरही अंत्यसंस्कार

गैंगवॉरमध्ये ठार झालेल्या तिघांवरही रविवारी तणावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अरिजितसिंग चव्हाण याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले, तर सय्यद आवेज व मोहम्मद अरबाज या दोघांचा दफनविधी करण्यात आला. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news