Jalna News : जबरी चोरीतील अट्टल आरोपी जेरबंद

नाशिक येथून पोलिसांनी घेतले ताब्यात, सोळा पोलिस ठाण्यात आहेत गुन्हे दाखल
Jalna News
Jalna News : जबरी चोरीतील अट्टल आरोपी जेरबंदfile photo
Published on
Updated on

Jalna Accused of theft arrested

जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यातील १६ पोलिस ठाण्यांतर्गत जबरी चोरी व घरफोडी करणाऱ्या अट्टल आरोपीस पोलिसांनी नाशिक येथून जेरबंद केले. आरोपीकडून इतरही अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

Jalna News
MD drugs seizure : मसनतपूर भागात एमडी ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त

जालना जिल्हयात जबरी चोरी, घरफोडीसारखे गुन्हे करणाऱ्या आरोपीने मागील काही वर्षात धुमाकूळ घातला होता. १७ फेब्रुवारी रोजी हाजी शेख इब्राहिम शेख वहाब (रा.कोसडी, ता. जिंतूर, जि. परभणी) यांना शहरातील जिजामाता चौक येथे अज्ञात आरोपीने चाकूचा धाक दाखवून ६० हजार रुपये चोरून नेले होते. या प्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयातील अज्ञात आरोपितांचा शोध घेत असताना तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदाराचे मदतीने माहिती मिळाली की, सदर गुन्हा शहरातील कन्हैयानगर भागात राहणारा आरोपी अशोक ऊर्फ मुक्या भिकाजी तरकसे याने त्याच्या साथीदारांसह केली आहे. आरोपीचा शोध घेत असताना आरोपी गुन्हा घडल्यापासून वारंवार वेगवेगळ्या शहरामध्ये लपत फिरत होता. १९ मार्च रोजी पोलिसांना माहिती मिळाली की, आरोपी मुकेश तरकसे हा मुंबई येथून नाशिक येथे येणार आहे.

Jalna News
Parbhani crime | पूर्णेतील दोन जबरी चो-यातील ५ गुन्हेगार चोरटे जेरबंद;८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

त्यानुषंगाने पोलिसांनी पथक रवाना करून आर ोपीचा सिन्नर, नाशिक येथे शोध घेतला. यावेळी आरोपी तेथे मिळून आला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन जालना येथे आणले असता त्याने जिजामाता चौकात गुन्हा केला असल्याची कबुली दिली. त्यानंतर आरोपीकडे गुन्ह्यातील मुद्देमालाबाबत चौकशी केली असता त्याने गुन्हयातील रोख १६ हजार ५०० रुपये रोख रक्कम त्याच्या राहत्या घरातून काढून दिले.

आरोपीकडे आणखी गुन्ह्यांबाबत चौकशी केली असता जुना जालन्यातील आदित्यनगर आरोपीने बंद घराचे कुलूप तोडून त्यामधून दोन सोन्याच्या अंगठ्या चोरी केल्याचे चौकशीत समोर आले. या प्रकरणी कदिम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. शहरातील सुवर्णकार नगरात आरोपीने खिडकी तोडून घरात प्रवेश करीत १६ हजार रुपये रोख व सोन्याचे दागिने चोरी केल्याचे सांगितले. या प्रकरात सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

या गुन्हयातील मुद्देमालापैकी ८ हजार ५०० रुपये रोख आरोपीने काढून दिले. आरोपीने जुना जालन्यातील राहुलनगर येथे एका इसमास अडवून त्यास चाकूचा धाक दाखवून त्याच्या खिशातील रोख २ हजार ५०० रुपये व एक मोबाईल चोरी केल्याचे तपासात समोर आले. या प्रकरणात कदिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे निदर्शनास आले. आरोपीने रोख २ हजार ५०० रुपये काढून दिले आहे. आरोपितास पुढील तपासासाठी सदर बाजार पोलिस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news