Crime News : दुकाने फोडणारा आरोपी जेरबंद

पोलिसांनी चोरी प्रकरणातील संशयितांची घेतली माहिती
sambhajinagar news
आरोपी जेरबंदfile
Published on
Updated on

Shop-breaking accused arrested

बिडकीन, पुढारी वृत्तसेवा बिडकीन पोलिस ठाणे हद्दीतील पोरगाव चौफुली येथे काही दिवसांपूर्वी दोन दुकाने फोडण्यात आली होती. या प्रकरणाचा छडा लावत बिडकीन पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. विशेष म्हणजे तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिस स्टेशन हद्दीतील सर्व चोरी प्रकरणातील संशयितांना रडारवर ठेवून पोलिसांनी सलग दुसऱ्या दिवशीही मोठी कारवाई करत आरोपीस गजाआड केले आहे.

sambhajinagar news
मका उत्पादक शेतकऱ्यांना रक्कम मिळेना

नामदेव सुभाष काळे (३९, रा. गेवराई बाशी, जि. छत्रपती संभाजीनगर) हे २९ जानेवारी रोजी पोरगाव चौफुली येथील आपले दुकान बंद करून घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमारे ९ वाजता दुकान उघडण्यासाठी आले असता शटरचे लॉक तोडलेले व आत सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. गल्ल्यातील अंदाजे २२ हजार रुपये रोख रक्कम चोरीस गेल्याचे आढळले. 1651 याच परिसरातील शेजारील दुकानातही चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. त्या दुकानातील गल्ल्यातील सुमारे २८ हजार ५०० रुपये रक्कम लंपास करण्यात आली होती. या प्रकरणी बिडकीन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

लखण कल्याण चंदनशिव (रा. नारायपूर, ता. गंगापूर) असे आरोपीचे नाव आहे. गुन्ह्याच्या तपासादरम्यान बिडकीन पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत पोलिस स्टेशन हद्दीतील सर्व चोरी प्रकरणातील संशयित आरोपींची माहिती गोळा करून त्यांना रडारवर ठेवले होते.

sambhajinagar news
Accident News : कारला भरधाव वाहनाची धडक; एक ठार, दोन जखमी

दरम्यान, आरोपी हा नारायणपूर (ता. गंगापूर) परिसरात एमआयडीसी भागात फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गुरुवारी (दि.१२) रात्री सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपीस १३ फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली. कोठडीत असताना चोरीतील ५ हजार रुपये रोख जप्त करण्यात आले.

विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी वाटमारी प्रकरणातील तीन आरोपींना अटक करून त्यांना हर्मूल कारागृहात रवाना करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी दुकानफोडी प्रकरणातील आरोपीस अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक मंजितसिंग सेना व त्यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news