नांदेड : वीज पडून तीन शेतकऱ्यांचा मृत्यू

नांदेड : वीज पडून तीन शेतकऱ्यांचा मृत्यू

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : जून महिना संपत आला तरी नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वदूर पाऊस अजून झाला नाही. सोमवारी रात्री काही भागात पाऊस झाला असला, तरी तो पेरणी योग्य नसल्याने जिल्हाभरातील पेरण्या रखडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. दरम्‍यान, भोकर तालुक्यातील पाळज शिवारात मंगळवारी सायंकाळी पेरणी करत असताना तीन शेतकऱ्यांवर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

पाळज येथेही शेतकऱ्यांनी मंगळवारपासून पेरणी करण्यास सुरूवात केली आहे. साईनाथ सातमवार (वय 30), राजेश्र्वर चटलावार (वय 40), बोजना रामनवार (वय 32) हे शेतकरी शेतामध्ये पेरणी करत असताना सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास अचानक ढगांचा गडगडाट होऊन वीज या तिन्ही शेतकऱ्यांच्या अंगावर पडल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाला. विभागीय अधिकारी डॉ. राजेंद्र खंदारे यांनी घटनास्‍थळी भेट दिली असून पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान,  मृग नक्षत्रात पावसाने दडी मारल्याने आता शेतकऱ्यांच्या नजरा आर्द्रा नक्षत्राकडे लागल्या आहेत. खरीप हंगाम सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वीची सर्व कामे करून पेरणीची तयारी केली होती. बाजारातून बी-बियाणे, खते खरेदी करून ठेवले; परंतु पाऊस पडला नसल्याने पेरणी रखडली आहे. सोमवारी रात्री जिल्ह्याच्या काही भागात पावसाला सुरूवात झाली. चांगला पाऊस पडेल असे वाटत होते; परंतु पेरणी योग्य पाऊस झाला नाही. तरीही अर्धापूर, भोकर, हिमायतनगर, हदगाव, माहूर या भागातील शेतकऱ्यांनी पेरणीस सुरूवात केली आहे.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news