नांदेड- दिल्ली सफदरजंग विशेष रेल्वे सुरू

नांदेड- दिल्ली सफदरजंग विशेष रेल्वे सुरू
Published on: 
Updated on: 

औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा : प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन दक्षिण-मध्य रेल्वेने हुजूर साहिब नांदेड ते दिल्ली सफदरजंग दरम्यान एक विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष रेल्वेमुळे या मार्गावरील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

नांदेड- दिल्ली ही गाडी 18 फेब्रुवारी रोजी नांदेड येथून सकाळी 9 वाजता निघणार आहे, तर दिल्ली सफदरजंग- नांदेड ही रेल्वे दिल्ली सफदरजंग येथून 19 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजता नांदेडकडे रवाना होणार आहे. ही गाडी पूर्णा, परभणी, जालना, औरंगाबाद, नगरसोल, अंकाई, मनमाड, जळगाव, भुसावळ, खांडवा, इटारसी, राणी कमलापती, बिना, वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशन, आग्रा कंट, पळवल या रेल्वे स्थानकांवर दोन्ही दिशांना थांबेल.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news