नांदेड : देगलूरला निघालेली स्कूल व्हॅन उलटली; ४ विद्यार्थी गंभीर जखमी

नांदेड : देगलूरला निघालेली स्कूल व्हॅन उलटली; ४ विद्यार्थी गंभीर जखमी
Published on
Updated on

देगलूर; पुढारी वृत्तसेवा: नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन येणाऱ्या स्कूल व्हॅनला झालेल्या अपघातात ४ विद्यार्थी गंभीर जखमी झाले. ही घटना आज (दि. ८) सकाळी नऊ वाजता खानापूर फाट्याजवळ घडली.

चालक ज्ञानेश्वर विठ्ठल कल्याणी (रा. धुप्पा शंकरनगर) हे खानापूर येथून (एमएच २६ एस ए २४७३) या स्कूल व्हॅनमधून विद्यार्थ्यांना घेऊन देगलूरकडे भरधाव निघाले होते. यावेळी खानापूर फाट्याजवळ नियंत्रण सुटल्याने व्हॅन पलटी झाली. या अपघातात शेख रिहान, शेख मुजीब, नवमी गावंडे, ममता मठवाले, बालाजी काळेवर, शंतनू बेलबुटे हे विद्यार्थी गंभीर जखमी झाले. जखमी विद्यार्थ्यांना देगलूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. तर यातील दोन जणांना घरी सोडण्यात आले आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news