देगलूर, पुढारी वृत्तसेवा खानापूर फाट्याजवळ असलेल्या देगलूर-नांदेड राज्य महामार्गावरील कंतेवार यांच्या शेताजवळ एका ट्रकने दुचाकीस्वारास चिरडले. त्यात दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू झाला.
या विषयी अधिक माहिती अशी की, तालुक्यातील वन्नाळी येथील उमेश नागनाथ कंतेवार (वय १९ वर्षे) हा युवक स्कुटी (क्रमांक एम. एच. २६ बि डब्ल्यू ४७५०) स्कूटीवर बसून वन्नाळी येथून देगलूरकडे जात होता. तो सकाळी ७:३० वाजता खानापूर फाट्याजवळील असलेल्या कंतेवार यांच्या शेताजवळ आला असता, बैलगाडीच्या बाजूने जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव ट्रक (क्रमांक एम एच २६ बि. ई.९४६३) ने स्कुटीला जोराची धडक दिली. त्यामुळे स्कुटी चालक हा ट्रकच्या समोरील टायर खाली आला. त्याही अवस्थेत ट्रक चालकाने १५ ते २० फूट पुढे त्या स्कूटी चालकास फरपटत नेल्याने स्कुटी चालकाच्या डोक्याला व हातापायाला गंभीर दुखापत होऊन तो जागीच ठार झाला.
घटनास्थळी हजर असलेले खंडू उर्फ संकेत संजय पाटील रा. वन्नाळी यांच्या दिलेल्या फिर्यादीवरून देगलूर पोलीस ठाण्यात ट्रक चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :