जालना; पुढारी वृत्तसेवा : उसाची बैलगाडी खाली करण्यावरून दोन मजुरामध्ये झालेल्या वादातून एकाने दुसऱ्याच्या गुप्तांगावर वार करुन खून ( murder ) केला. ही घटना घनसावनगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील सागर सहकारी साखर कारखान्यात बुधवारी (दि. २६) पहाटे घडली.
घनसावंगी तालुक्यातील मुरमा येथील ऊसतोड कामगार गुलाब केरभान सोनवणे हे बुधवार पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास ऊसतोडणी करून तो ऊस बैलगाडीतुन तिर्थपुरीच्या सागर साखर कारखान्यात घेऊन गेले होते. ( murder )
बैलगाडीतील ऊस कारखान्यातील गव्हाणीजवळ क्रेनखाली उतरवीत असताना दीपक लक्ष्मण गायकवाड (रा. खालापुरी) याने त्याची ऊसाची गाडी आडवी लावली. आडवी लावलेली बैलगाडी काढण्यास सांगितल्यावरून ऊसतोड मजूर गुलाब सोनवणे आणि दीपक गायकवाड यांच्यात वाद झाला. ( murder )
या वादानंतर दीपक गायकवाड याने गुलाब सोनवणे यांच्या बैलगाडीत उडी मारून, गुलाब यांच्या गुप्तांगावर लाथा मारल्या. या मारहाणीत गंभीर जखमी होऊन गुलाब सोनवणे हे जागीच मरण पावले.
याप्रकरणी गोंदी पोलिसांनी मयत गुलाब सोनवणे यांचा मुलगा नवनाथ सोनवणे यांचा फिर्यादीवरून आरोपी दीपक गायकवाड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ हे पुढील तपास करीत आहेत.