श्रीक्ष्रेत्र माहूर | श्री रेणुकामाता मंदिरात महाअष्टमीला होम-हवन विधी संपन्न

श्रीक्ष्रेत्र माहूरगड
श्रीक्ष्रेत्र माहूरगड

श्रीक्ष्रेत्र माहूर, पुढारी वृत्‍तसेवा : शारदीय नवरात्र उत्सवात अष्टमीला पौराणिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्व आहे. दि. ३ ऑक्‍टोबर रोजी सायंकाळी १० वाजता दुर्गासप्तशती पाठाचे पुण्याह वाचन व मातृका पूजन करून होम हवन विधीला प्रारंभ करण्यात आला. होम हवन विधीचे यजमान संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश शशिकांत बांगर हे होते.

अष्टमीच्या होमात तूप, तीळ,तांदूळ याची आहुती दिली जाते. त्यात ९ प्रकारच्या समिधा टाकल्या जातात. या विधीला वेद पाठशाळेचे प्रमुख वेशासं निलेश केदार गुरुजी,चंद्रकांत रिठ्ठे, अनिल काण्णव, विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय काण्णव, विनायक फांदाडे, आशिष जोशी, अरविंद देव, बालाजी जगत, दुर्गादास भोपी, पूजारी भवानीदास भोपी, शुभम भोपी व वेदपाठ शाळेचे विद्यार्थी बसले होते.

श्री रेणूका मातेची अलंकार पुजा रात्री १२ वाजता संपन्न झाली. हवन विधी स. ३ वा. आटोपला. होमहवन विधीचे पौरोहित्य व दुर्गा सप्तशती पाठाचे पठन वेशासं रवींद्र काण्णव यांनी केले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news