नांदेड : माहूरगडावर रेणूका भक्तांची अलोट गर्दी | पुढारी

नांदेड : माहूरगडावर रेणूका भक्तांची अलोट गर्दी

श्रीक्षेत्र माहूर, पुढारी वृत्तसेवा : शारदीय नवरात्रौत्सवनिमित्त सप्तमीला श्री रेणूका मातेचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली.दरम्यान, मंदिर प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे भाविकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. नवरात्र काळात श्री रेणुका मातेच्या दर्शनासाठी भाविकांची मागील सहा दिवसांपासून माेठी गर्दी आहे. आज रविवार सुटीचा दिवस असल्याने दर्शन रांग  ३०० मीटर शिखररोड पर्यंत गेली आहे. यामुळे गर्दीचे पूर्वीचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.

माहूरगडावर परिवहन मंडळाच्या बसेस जेथून सोडल्या जातात, टी पॉइंटवर भाविकांची अलोट गर्दी पहायला मिळत आहे. अफाट गर्दीमुळे बसेस कमी पडल्याचे चित्र दिसून आले. आजच्या प्रचंड गर्दीमुळे लहान बालक, वयोवृद्ध व्यक्ती यांचेसह जवळपास सर्वच भाविकांचे अतोनात हाल झाले. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय डोंगरे हे सकाळपासूनच टी पॉइंटवर लक्ष ठेवून आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button