नांदेड-धानोरातील खंडोबा मंदिराच्या कळसावर पडली वीज, सुदैवाने जीवित हानी टळली
नरसीफाटा (नांदेड) – पुढारी वृत्तसेवा – नायगाव तालुक्यात बुधवारी दुपारी अचानक विजेच्या गडगडासह पावसाला सुरूवात झाली. याच पावसात धानोरा ( त.मा ) येथील खंडोबा मंदिराच्या कळसावर वीज कोसळल्याने कळस खाली पडला; पण मंदिराच्या आवारात कोणीही नसल्याने सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. ही घटना बुधवार, २८ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान घडली.
बुधवारी सकाळी ऊन पडले; पण दुपारी अचानक आभाळ दाटून आले. दीड वाजता विजेच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. याच पावसात धानोरा (त. मा.) या गावच्या पुर्व दिशेस असलेल्या खंडोबा मंदिराच्या पितळी कळसावर वीज कोसळली. वीज कोसळताच कळसाला भेगा पडून कळसाचे वेगवेगळे भाग होऊन खाली पडले. वीजेमुळे कळसाचे नुकसान झाले; पण मंदिराचे इतर कुठलेही नुकसान झाले नाही, अशी माहीती चेअरमन यशवंत पा.कु-हाडे, बालाजी पाटील, पं. स. सदस्य प्रतिनिधी ओम धानोरकर यांनी दिली.
हेही वाचा :
- UP-Muzaffarnagar : धक्कादायक! त्याच्या पोटातून काढले तब्बल ६३ चमचे बाहेर
- सांगली : 'पालिकेची सत्ता जाईल' या भितीपोटी त्यांनी करवाढ स्थगितीचे दिले पत्र : संजय भिंगारदेवे
- पिंपळनेर : विधवा प्रथाबंदी काळाची गरज; अनिसच्या वतीने 'जागर स्त्री शक्तीचा'
- नैसर्गिक वायू महागण्याची शक्यता; CNGच्या किमती वाढणार? १ ऑक्टोबरपासून नवे दर – Natural Gas price may be hiked

