Rohit Pawar Udgir Visit : बेघरांसोबत आमदार रोहित पवारांची दिवाळी; दुष्काळावरून सरकारवर निशाणा

‘केंद्रात आणि राज्यात तुमचीच सत्ता, मग हिंदू खतरे मे कसे?’; चारा छावण्या सुरू करण्याची मागणी
Rohit Pawar Udgir Visit
Rohit Pawar Udgir Visitpudhari photo
Published on: 
Updated on: 

उदगीर : दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर आलेल्या आ. रोहित पवार यांनी उदगीर येथील बेघर निवारा केंद्रात निराधारांसोबत दिवाळी साजरी केली. बेघरांना मिठाई वाटप करून त्यांची आस्थेने विचारपूस केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणापासून ते दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांपर्यंत विविध विषयांवर सरकारला धारेवर धरले.

उदगीरमध्ये दाखल होताच रोहित पवार यांनी बेघर निवारा केंद्राला भेट दिली. तेथील वृद्ध आणि निराधारांची विचारपूस करून जेवण, औषधोपचार आणि उपलब्ध सुविधांची माहिती घेतली. ज्यांना घर आणि कुटुंब नाही, अशा लोकांसोबत दिवाळी साजरी करण्यातच खरा आनंद असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

Rohit Pawar Udgir Visit
Jalna Crime : कर्मचाऱ्याला फायटरने मारहाण; जीवे मारण्याची धमकी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत विचारले असता, आमचे नेते शरद पवार या विषयावर स्थिर आहेत आणि त्यांची भूमिका स्पष्ट आहे. मात्र, अजितदादांच्या पक्षातील नेते विलीनीकरणाबाबत अशी विधाने का करीत आहेत, हे त्यांनाच विचारा, असे रोहित पवार म्हणाले.‘हिंदू खतरे मे है’ या मुद्द्यावर बोलताना त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारला सवाल केला.

केंद्रात आणि राज्यातही तुमचीच सत्ता असताना हिंदू खतरे मे कसे? असा प्रश्न उपस्थित करीत सत्ताधाऱ्यांनीच अशी भूमिका मांडणे म्हणजे स्वतःच्या अपयशाची कबुली देण्यासारखे असल्याची टीका त्यांनी केली.दुष्काळी परिस्थितीवर बोलताना शेतकऱ्यांकडे चारा आणि पाणी नसल्याने पशुधन विकण्याची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले.

Rohit Pawar Udgir Visit
Abdul Sattar : दुष्काळात कर्जवसुलीला स्थगिती द्या !

एक लाख रुपयांचे जनावर अर्ध्या किमतीत विकले जात असल्याची व्यथा मांडत सरकारने तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी केली. केवळ घोषणा न करता शेतकऱ्यांपर्यंत प्रत्यक्ष मदत पोहोचविण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दुष्काळी दौऱ्यात शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या असून त्या सरकारपर्यंत पोहोचविणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, प्रदेश सचिव सोमेश्वर कदम, शहर जिल्हाध्यक्ष राजा मणियार, भरत सूर्यवंशी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

अशी दिवाळी साजरी करण्याततच खरा आनंद!

दिवाळी हा आनंद वाटण्याचा सण आहे. ज्यांना स्वतःचे घर नाही, कुटुंबाचा आधार नाही, अशा निराधारांसोबत सण साजरा करण्यात खरा आनंद आहे. उदगीर येथील बेघर निवारा केंद्रातील वृद्ध आणि निराधारांना मिठाई वाटप करून त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या जेवण, औषधोपचार आणि सुविधांची माहिती घेतली. समाजातील वंचित घटकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणे हीच दिवाळीची खरी भावना आहे, अशी भूमिका आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.